Lok Sabha Election 2024: 'राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतायेत..', संजय राऊतांची घणाघाती टीका

मुंबई तक

20 May 2024 (अपडेटेड: 20 May 2024, 12:22 PM)

Sanjay Raut Voting: 'राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षासाठी एवढी मेहनत केली असती तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते.' अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केली आहे.

संजय राऊतांची घणाघाती टीका

संजय राऊतांची घणाघाती टीका

follow google news

Sanjay Raut vs Raj Thackeray: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024)  साठी महाराष्ट्रात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज (20 मे) मतदान पार पडतं आहे. अशातच यंदा पहिल्यांदाच शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेसला आणि राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार का? या प्रश्नावर संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. (lok sabha election 2024 raj thackeray kisses the stolen things sanjay raut sharp criticism over bow and arrow voting)

हे वाचलं का?

'तो डुप्लिकेट धनुष्यबाण आहे.. तो बाळासाहेबांचा नाही ज्याला राज ठाकरे मतदान करणार आहेत तो.. चोरलेला आहे.. चोरीचा मालावर ते हक्क सांगतायेत.. राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतायेत..' अशी टीका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली.

'तो चोरलेला धनुष्यबाण.. राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतायेत...'

'तो डुप्लिकेट धनुष्यबाण आहे.. तो बाळासाहेबांचा नाही ज्याला राज ठाकरे मतदान करणार आहेत तो.. चोरलेला आहे.. चोरीचा मालावर ते हक्क सांगतायेत.. राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतायेत.. ते नकली ओठ आहेत.. धनुष्यबाण नाहीए ते.. त्यांना सवय आहे.. आम्ही पंजावर मतदान करतोय. पण तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आहे. ज्या काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात जास्त योगदान दिलं आहे.' 

'ज्या कमळाबाईला आम्ही 25 वर्ष मतदान केलं त्या कमळाबाईने देशाची कशी वाट लावली आहे, महाराष्ट्र कसा लुटला.. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून देश आणि संविधान वाचविण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला.' 

'निशाणी कोणती हा प्रश्न नसून लढाई देश आणि संविधान वाचविण्याची आहे.. उद्धव  ठाकरे पंजाला मतदान करतायेत तसे काँग्रेसचे अनेक नेते मशालीवर, तुतारीवर मतदान करताना तुम्ही पाहाल.' असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं. 

'राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षासाठी एवढी मेहनत केली असती तर...'

'एका बाजूला मुडदे पडले निष्पाप लोकं मरण पावले आणि त्यांच्या समोर देशाचे नेते भाजपचे कार्यवाहक पंतप्रधान रोड शो करतायेत हे किती असंवेदनशील आहे. ईशान्य मुंबईत तुम्ही जी नावं घेतली. श्रीमान राज ठाकरे असतील, नारायण राणे असतील.. सगळे आले.. तुम्हाला रस्त्यावर उतरवलंय ना आम्ही.. घाम गाळतायेत'

'राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षासाठी एवढी मेहनत केली असती तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते. पण शेवटी मी म्हटलं ना.. भाजपने अनेकांना भाड्याने घेतलं आहे. त्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय.' 

'असे काय महान दिवे लावलेत मोदी आणि शाह यांनी.. ज्या मोदी आणि शाह यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका असे आपण सांगत होतात. त्यांच्या पखाल्या वाहताना आम्ही तुम्हाला पाहिलं.. आम्हाला वाईट वाटलं.' असा टोलाही संजय राऊतांनी लगावला. 

राऊतांची भाजपवर तुफान टीका

'निवडणूक आयोग ही सध्या तरी भाजपची शाखा म्हणून काम करतेय. पण या सगळ्याशी सामना करत आम्ही जिद्दीने रस्त्यावर उतरलोय मतदानासाठी.. लोकंही उतरतायेत.. आता मी ज्या मतदार केंद्रावर गेलो त्यात चुकीचं काय आहे? निवडणूक आयोगाच्या नियमावलीत अशी कोणती गाइडलाइन नाही की, मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी एखादं समांतर मतपत्रिका.. पूर्वी असायची टेबलवर.. ही असते मतपत्रिका.. त्यावर उमेदवारांचं नाव आहे.' 

'आता EVM आहे त्यामुळे त्याची रिप्लिका असते टेबलावर.. इकडले काही लोकं.. भाजपचे वैगरे हे पोलिसांवर आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर दादागिरी करून.. आमच्या शिवसैनिकांना त्यांनी अटक केली.' 

'पैसे वाटप करण्याबाबत आम्ही तक्रार केली तेव्हा पैसे वाटप करणाऱ्यांना अटक झाली नाही. किंबहुना गृहमंत्री हे तिकडे आले आणि त्यांनी पोलिसांवर दबाव आणून शिवसैनिकांना अटक करायला लावली.' 

'याच्यातच पोलीस आणि निवडणूक आयोग कसा पक्षपातीपणा करतोय हे स्पष्ट होतंय. पण 4 जूननंतर  तुम्हाला  कळेल की, तुमचा दबाव, पैशाचं वाटप झुगारून महाराष्ट्रातील मतदारांनी मतदान केलंय.' 

'राज्याचे गृहमंत्री पैशाचं वाटप करण्यासाठी बेकायदेशीररित्या संरक्षण देण्यासाठी मुलुंडला येतात.. आणि आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांच्या अटकेचे आदेश देतात. म्हणजे हे सगळं जाणूनबुजूनच होतंय.' 

'तुम्हाला जिंकण्याची अजिबात खात्री नाही. मतदार आणि जनता तुमच्यासोबत नाही.. या भीतीपोटी तुम्ही आमच्या लोकांना अटक करत आहेत.' अशी टीकाही यावेळी करण्यात आली. 

 

    follow whatsapp