Lok Sabha : Bjpला किती जागा मिळणार? राजदीप सरदेसाईंनी वर्तवले भाकित

प्रशांत गोमाणे

31 May 2024 (अपडेटेड: 31 May 2024, 08:29 PM)

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील भाजपचा निकाल हा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. तसेच भापजपा बहुमत मिळणार नाही, या भूमिकेचा मी नाही आहे,असे देखील राजदीप यांनी स्पष्ट केले.

lok sabha election prediction rajdeep sardesai told how many seats bjp get pm narendra modi congress rahul gandhi exit poll 2024

न्यूज तकने राजदीप सरदेसाई यांची मुलाखत घेतली आहे.

follow google news

Rajdeep Sardesai, Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान उद्या 1 जूनला पार पडणार आहे. या मतदानानंतर संध्याकाळी एक्झिट पोलचे आकडे समोर येणार आहेत. तत्पुर्वी अनेक राजकीय पक्ष आणि राजकीय विश्लेषक आपआपल्या परीने या लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण करतायत आणि निकालाच अंदाज बांधतायत. आता ज्येष्ठ पत्रकार आणि इंडिया टुडेचे कंसल्टिंग एडीटर राजदीप सरदेसाई यांनी देखील लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतचा आपला अंदाज व्यक्त केला आहे. (lok sabha election prediction rajdeep sardesai told how many seats bjp get pm narendra modi congress rahul gandhi exit poll 2024) 

हे वाचलं का?

न्यूज तकने राजदीप सरदेसाई यांची मुलाखत घेतली आहे.या मुलाखतीत राजदीप सरदेसाई यांनी लोकसभा निवडणुकीत नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा येतील? कोण बाजी मारणार? भाजप 400 पार करणार का? यासांरख्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. 
 
लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा येतील? असा सवाल राजदीप सरदेसाई यांना विचारण्यात आला होता. यावर राजदीप म्हणाले, 'माझ्याकडे जागांची नेमकी आकडेवारी नाही आहे, पण निवडणुक कव्हर करताना मला जे समजले त्यावरून मी माझे अंदाज बांधु शकतो. भाजप 400 ओलांडण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही आपण भाजप आणि पंतप्रधान मोदींना कमी लेखू शकत नाही', असे राजदीप म्हणतात. 

हे ही वाचा : अजित पवारांच्या दोन नेत्यांमध्ये पडली ठिणगी, कारण ठरले आव्हाड!

'या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल असे वाटते. जर जागांबद्दल बोलायचं झालं तर भाजप 272 ते 300 जागा जिंकेल असा माझा अंदाज आहे. तसेच भाजप 300 च्या वर जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण मोदी मोठे व्यक्तिमत्व आहेत आणि मोठ्या फरकाने निवडणूक जिंकत आहेत', असे राजदीप यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीतील भाजपचा निकाल हा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र  या दोन राज्यांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. तसेच भापजपा बहुमत मिळणार नाही, या भूमिकेचा मी नाही आहे,असे देखील राजदीप यांनी स्पष्ट केले. 

हे ही वाचा : भाजपची उडेल झोप, काँग्रेसचं काय? सट्टा बाजाराचे खळबळ उडवणारे अंदाज

400 पारची घोषणा करणार नुकसान

लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपने 400 पारचा नारा दिला होता. यानंतर पक्षातील नेत्यांनी अनेक विधाने केली होती. काही नेत्यांनी संविधान बदलाची भाषा,मुस्लिम आरक्षण संपवण्याची भाषा केली होती. काँग्रेसच्या नेत्यांनी हेच मुद्दे पकडून भापजला 400 पार जागा संविधान रद्द करण्यासाठी हव्या असल्याचा प्रचार केला होता. यामुळे देशातील दलित मतदारांमध्ये खळबळ उडाली होती आणि त्यामुळे ते प्रभावित होऊन विरोधी पक्षांना मतदान करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घोषणेमुळे भाजपचे फायद्याऐवजी नुकसान झाले आहे, असे माझे मत असल्याचे राजदीप म्हणतात. 

    follow whatsapp