Navneet Rana : '15 सेकंद पोलीस हटवा, छोट्याला आणि मोठ्याला...', ओवेसींबद्दल राणांचं वादग्रस्त विधान

मुंबई तक

09 May 2024 (अपडेटेड: 09 May 2024, 10:13 AM)

Navneet Rana Controversial Statement : भाजप खासदार नवनीत राणा 8 मे रोजी हैदराबादमध्ये भाजप उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. या मतदारसंघात भाजपच्या माधवी लता विरुद्ध असदुद्दीन ओवेसी अशी लढत आहे. 

नवनीत राणा यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर टीका.

भाजपच्या उमेदवार नवनीत राणा, अकबरुद्दीन ओवेसी आणि असदुद्दीन ओवेसी.

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवनीत राणा यांचे विधान

point

अकबरुद्दीन ओवेसींच्या विधानाला उत्तर

point

माधवी लता यांच्या प्रचारसभेतून दिला इशारा

Navneet Rana on Owaisi : अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नवनीत राणा अकबरूद्दीन ओवेसींनी केलेल्या विधानावर बोलत आहेत. १५ मिनिटे पोलीस हटवा, काय करू शकतो दे दाखवून देऊ, असे विधान अकबरद्दीन ओवेसींनी केलं होतं. त्यावर राणा यांनी तुम्हाला १५ मिनिटे लागतील आम्हाला फक्त १५ सेकंद लागतील, असे विधान केले आहे. 

हे वाचलं का?

नवनीत राणा यांचे एक विधान व्हायरल होत आहे. (नवनीत राणा व्हायरल व्हिडिओ ओवेसी). एआयएमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्या जुन्या वादग्रस्त विधानावर त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नवनीत राणा ओवेसी बंधूंना काय म्हणाल्या? 

भाजप उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा ८ मे रोजी हैदराबादमध्ये होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की,

"छोटा (अकबरुद्दीन ओवेसी) म्हणतो की, 15 मिनिटांसाठी पोलिसांना हटवा आणि आम्ही काय करू शकतो ते दाखवू. मी त्या छोट्याला हेच सांगते की तुला १५ मिनिटे लागतील. पण, आम्हाला फक्त १५ सेकंद लागतील. जर 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर छोट्याला (अकबरुद्दीन ओवेसी) आणि मोठ्याला (असदुद्दीन ओवेसी)ते कुठून आले आणि कुठे गेले हे कळणार नाही. आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील."

हेही वाचा >> दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येणार? अजित पवारांचे सूचक विधान

नवनीत राणा यांनी त्यांच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. महत्त्वाचं म्हणजे राणा यांनी हे ट्विट अकबरुद्दीन ओवेसी आणि असदुद्दीन ओवेसी यांनाही टॅग केले आहे.

नवनीत राणांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

नवनीत राणा यांच्या या वक्तव्याबाबत एआयएमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी निवडणूक आयोगाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा >> 'बाळासाहेब ठाकरेंच्या नकली शिवसेनेची संतान..', आंध्रप्रदेशातून मोदींची ठाकरेंवर जहरी टीका 

'आज तक'शी बोलताना वारिस पठाण म्हणाले की, भाजप नेत्याचे हे विधान निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करते, कारण यामुळे दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते. पठाण म्हणाले की,

"मी जर नवनीत राणांसारखे भाषण केले असते, तर मी तुरुंगात गेलो असतो. पोलिसांना हटवण्याचे वक्तव्य दिल्यानंतर 15 मिनिटांनी अकबरुद्दीन ओवेसी हे स्वत: पोलिसांना शरण गेले होते. 40-42 दिवस ते तुरुंगात राहिले. दहा वर्षे कोर्टात लढले आणि निर्दोष सुटले. नवनीत राणा यांच्यावर निवडणूक आयोग कधी कारवाई करणार आणि त्यांना कधी तुरुंगात पाठवणार? मुस्लिमांच्या विरोधात दररोज विधाने केली जातात पण कारवाई होत नाही."

हैदराबाद लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. तर असदुद्दीन ओवेसी पुन्हा एकदा मैदानात आहेत. या मतदारसंघात 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

    follow whatsapp