Arvind Sawant: "मोदींनी गडकरींनाही फटकन उडवून लावलं", मोदींच्या कॅबिनेटमधील स्फोटक किस्से

मुंबई तक

16 May 2024 (अपडेटेड: 16 May 2024, 08:37 PM)

Mumbai Tak Chavadi: Former Union Minister and MP Arvind Sawant told the story of exactly how decisions are taken in Prime Minister Narendra Modi's cabinet

अरविंद सावंतांनी सांगितले मोदींच्या कॅबिनेटमधील किस्से

अरविंद सावंतांनी सांगितले मोदींच्या कॅबिनेटमधील किस्से

follow google news

Arvind Sawant Mumbai Tak Chavadi: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या पाचवा आणि निर्णायक असा मतदानाचा टप्पा आता शिल्लक आहे. ज्यामध्ये मुंबईतील सहाही मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. अशावेळी दक्षिण मुंबई मतदारसंघातील शिवसेना (UBT) पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी मुंबई Tak चावडीवर येत खास गप्पा मारल्या. याच गप्पांदरम्यान, सावंतांनी मोदींच्या कॅबिनेटमधील काही खळबळ उडवून देणारे किस्से सांगितले. (nitin gadkari spoke but pm modi blew him away too arvind sawant recounted in modi cabinet meeting)

हे वाचलं का?

'महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये काही चांगले सल्ले दिलेले असतानाही त्यांना पंतप्रधान मोदींनी उडवून लावलं.' असा दावा अरविंद सावंत यांनी चावडीवर बोलताना केला.

मोदींच्या कॅबिनेट बैठकीत नेमकं काय घडतंय.. वाचा जसंच्या तसं.. 

'राज्यातील कॅबिनेट बैठकीला सचिव बसतात. पण केंद्रात कोणी बसत नाही. फक्त मंत्री बसतात.. ज्या मंत्र्याला एखादा कायदा आणायचाय किंवा दुरुस्ती करायचीय तर ती तो मंत्रिमंडळ बैठकीत मांडतो. पण ती आधी मोदींना माहिती असते.' 

'आम्हाला त्याबाबत आदल्यादिवशी रात्री त्याची माहिती दिली जाते. कॅबिनेट नोट ही रात्री उशिरा येते.'

हे ही वाचा>> Sharad Pawar : "लाचारी करावी, पण...", पवारांनी पटेलांचे टोचले कान

'मी मंत्रिमंडळ बैठकीत जेव्हा गेलो तेव्हा पहिल्यांदा मला जावडेकर भेटले. म्हटलं प्रकाश.. बोलता येतं का रे..? ते म्हणाले 'न बोललेलं बरं' 

'मग गडकरी आले थोड्या वेळाने.. 'अगदीच गरज असेल तर बोल..' म्हटलं ठीकए.. मौनं सर्वार्थ साधनम्..' 

'तरी पण मला एक-दोनदा बोलयाला दिलं.. नाही असं नाही. उगीच खोटं बोलणार नाही मी.. म्हणजे जेव्हा कामगार कायदा आणला गंगवारने.. तेव्हा मी विरोध केला त्याला.. मी म्हटलं.. सर ये गलत होगा.. याचा इम्पॅक्ट आणि सोशल इम्पॅक्ट हा चुकीचा होईल.'

हे ही वाचा>> '...तर मी सुद्धा मोदींच्या मदतीला धावून जाईन', ठाकरेंचं मोठं विधान

'तेवढ्या पुरता ते म्हणाले.. 'गंगवार सावंतजी से बात करो.. फिर दुबारा लेके आयो.. देखेंगे' पण मी राजीनामा दिला त्यानंतर कायदे आले. तोपर्यंत थांबले. पण ते काय त्यांच्या मनात होतं करायचं...' 

'सगळे गप्प असतात. कोणी बोलतही नाही.. एक-दोनदा गडकरी पण बोलले पण त्यांनाही उडवून लावलं असं फटाकन.. तेव्हा मला खूप वाईट वाटलं.. अरे एक चांगला काही सल्ला देत असतील तर..' 

'ते सगळं मेरी मर्जी असंच असतं तिथे.. कुणीच बोलत नाही. फक्त 370 जेव्हा केलं तेव्हा ते अमित शाहांनी मांडलं.. तो एकमेव त्या सबंध कारकीर्दीतील आनंदाचा क्षण होता ज्या दिवशी कॅबिनेट हसत-खेळत वागली.' असं म्हणत अरविंद सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांची मंत्रिमंडळात एकाधिकारशाही असल्याचा आरोप केला आहे.

    follow whatsapp