Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar : (धनंजय साबळे, अमरावती) महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी जाणार नाही, यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर मोठी घोषणा केली. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचीही घोषणा केली.
ADVERTISEMENT
आंबेडकर म्हणाले, "वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली. त्यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जे आमच्यासोबत समझोता करायला उत्सुक होते, त्यांना मी म्हणालो होतो की, जरांगे पाटील फॅक्टर लक्षात घेतला पाहिजे. पण, दुर्दैवाने तो फॅक्टर लक्षात घेतला नाही."
हेही वाचा >> शिंदेंच्या 5 ते 6 खासदारांचा पत्ता होणार कट?
"जरांगे पाटील आणि माझ्यासह पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाची मुदत आज संपत आहे. पण, दुसऱ्या टप्प्यापासून त्यांच्यासंदर्भातील चर्चा ही 31 मार्च आणि 1 व 2 एप्रिल रोजी पूर्ण करायची हा निर्णय झाला आहे", अशी माहिती आंबेडकरांनी जरांगेंच्या भेटीबद्दल दिली.
मुस्लिमांना उमेदवारी देणार
"भाजपने मुस्लिमांचं विलगीकरण सुरू केले आहे. त्याला थांबवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवार उतरवायचे. तिसरा मुद्दा जैन समाजाचा उमेदवारही जिंकून आणायचा. महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांची, वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लीम इतरांची ही नवीन वाटचाल असं आम्ही मानतोय. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल, अशी अपेक्षा आम्ही धरतोय."
हेही वाचा >> सांगली ठाकरेंकडेच! 17 उमेदवारांची केली घोषणा
"राजकारण आणि निवडणूक यामध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो. त्यामुळे निवडून गेल्याची बांधिलकी ही मतदाराबरोबर राहत नाही. ज्याने निधी दिला त्याच्याशी होते म्हणून गावागावांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचार सुरू केला पाहिजे. शासनाने नेमून दिलेल्या खर्चाच्या आतमध्येच या निवडणुका पार पडतील असा आमचा प्रयत्न होणार आहे", अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार
भंडारा गोंदिया - संजय गजानन केवट
गडचिरोली चिमूर - हितेश पांडुरंग मडावी
चंद्रपूर - राजेश वारलुजी बेरे
बुलढाणा - वसंत राजाराम मगर
अकोला - प्रकाश आंबेडकर
अमरावती - कु. प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवाण
वर्धा - प्रा. राजेंद्र साळुंके
यवतमाळ वाशिम - खेमसिंग प्रतापराव पवार
नागपूर - काँग्रेसला पाठिंबा
सांगलीतून ओबीसी बहुनज पार्टीचे प्रकाश शेंडगे उभे राहिल्यास त्यांना पाठिंबा.
ADVERTISEMENT