मोठी बातमी.. लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या होणार जाहीर, महाराष्ट्रात किती टप्प्यात मतदान?

मुंबई तक

15 Mar 2024 (अपडेटेड: 15 Mar 2024, 01:39 PM)

Election Commission press conference: निवडणूक आयोग शनिवारी (१६ मार्च) दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर करणार आहे. त्यासाठी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद बोलाविण्यात आली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या होणार जाहीर

point

देशभरात 7 ते 8 टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता

point

महाराष्ट्रात किती टप्प्यात निवडणूक?

नवी दिल्ली: निवडणूक आयोग शनिवारी दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर करणार. यासोबतच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या जाणार आहेत. (press conference by the election commission to announce the schedule for general elections 2024 will be held at 3 pm 16th march)

हे वाचलं का?

यासोबतच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या जाणार आहेत. ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या निवडणुकांसोबतच विधानसभेच्या निवडणुका देखील पार पडणार आहेत.

हे ही वाचा>> Ajit Pawar: 'उतारवयातील लोकांनी भजन करायचं', अजितदादांचा पुन्हा काकांना टोमणा!

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद ही निवडणूक आयोगाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते थेट प्रक्षेपित केली जाणार आहे. लोकसभा निवडणूक सात ते आठ टप्प्यात होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. तर महाराष्ट्रात 2 ते 3 टप्प्यात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे.

 

 

तत्पूर्वी, गुरुवारी नवीन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती झाल्या. ज्यानंतर त्यांनी आज (15 मार्च) पदभार स्वीकारला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी सकाळी दोन्ही निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांचे स्वागत केले. या दोघांनीही पदभार स्वीकारल्यानंतर आज अकराच्या सुमारास निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

हे ही वाचा>> CM शिंदेंनी शिवतारेंना पाहायला लावली तब्बल 7 तास वाट...

यादरम्यान दोन्ही निवडणूक आयुक्तांनी निवडणूक कार्यक्रमाला अंतिम रूप देण्याबाबत सीईसीसोबत विचारमंथन केले.

2019 साली लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात झालं होतं मतदान

2019 मध्ये लोकसभा निवडणुका सात टप्प्यात पार पडल्या होत्या. गेल्या वेळी निवडणूक आयोगाने 10 मार्च रोजी तारखा जाहीर केल्या होत्या. त्यावेळी पहिल्या टप्प्याचे  मतदान हे 11 एप्रिलला तर शेवटच्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान झाले होते. तर 23 मे रोजी निकाल लागला. त्या निवडणुकीच्या वेळी देशात 91 कोटींहून अधिक मतदार होते, त्यापैकी 67 टक्के मतदारांनी मतदान केले होते.

2019 मध्ये नेमका कसा होता निकाल? 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 2014 च्या तुलनेत मोठा विजय मिळवला होता. 2014 मध्ये भाजपने 282 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये 303 जागा जिंकल्या होत्या. तर एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या. भाजपला 37.7% पेक्षा जास्त मते मिळाली होती, तर NDA ला 45% मते मिळाली होती. तर काँग्रेसला केवळ 52 जागा जिंकता आल्या होत्या.

    follow whatsapp