Maharashtra Exit Poll: महाविकास आघाडीचा तब्बल 'एवढ्या' जागांवर होणार विजय? पाहा यादी

मुंबई तक

• 10:15 PM • 02 Jun 2024

rudra research maharashtra exit poll maha vikas aghadi will win 34 seats and mahayuti win only 13 seats see the full list lok sabha election 2024

महाविकास आघाडीचा 'एवढ्या' जागांवर होणार विजय? पाहा यादी

महाविकास आघाडीचा 'एवढ्या' जागांवर होणार विजय? पाहा यादी

follow google news

Lok Sabha Election 2024 Maharashtra Exit Poll MVA Seats: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी आहे. लोकसभा निवडणुकीत आता अवघ्या देशाचं लक्ष हे महाराष्ट्राकडे लागलं आहे. त्यातच वेगवेगळे एक्झिट पोलही आता समोर येत आहे. त्यापैकी रुद्र रिसर्च (Rudra Research)संस्थेच्या एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) 48 मतदारसंघांपैकी महाविकास आघाडी नेमक्या किती आणि  कोणत्या जागा जिंकणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (rudra research maharashtra exit poll maha vikas aghadi will win 34 seats and mahayuti win only 13 seats see the full list lok sabha election 2024)

हे वाचलं का?

Rudra Research च्या एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडीला राज्यात 48 पैकी 34 जागा मिळतील. ज्यामध्ये शिवसेना (UBT) 14, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा आणि काँग्रेसला 12 जागांवर विजय मिळेल. Rudra Research च्या एक्झिट पोलनुसार, असे नेमके कोणते मतदारसंघ असणार हे आपण आता पाहूयात.

हे ही वाचा>> Solapur Lok Sabha : राम सातपुतेंबद्दल एक्झिट पोल काय सांगतो?

Rudra Research च्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला किती मतदारसंघात विजय मिळेल?

1. मुंबई उत्तर पश्चिम 
अमोल किर्तीकर (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता

2. मुंबई उत्तर पूर्व
संजय दिना पाटील  (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
मिहीर कोटेचा (भाजप) - पराभवाची शक्यता

3. मुंबई उत्तर मध्य 
वर्षा गायकवाड (काँग्रेस) - जिंकू शकतात
उज्ज्वल निकम (भाजप) - पराभवाची शक्यता

4. मुंबई दक्षिण मध्य
अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
राहुल शेवाळे (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता

5. मुंबई दक्षिण 
अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
यामिनी जाधव (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता

6. नंदूरबार
गोवाल पाडवी (काँग्रेस) - जिंकू शकतात
हिना गावित (भाजप) - पराभवाची शक्यता

7. दिंडोरी
भास्कर भगरे (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
भारती पवार (भाजप) - पराभवाची शक्यता

8. नाशिक
राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
हेमंत गोडसे (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता
शांतीगिरी महाराज (अपक्ष) - तिसऱ्या स्थानी

9. बुलढाणा
नरेंद्र खेडेकर (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
प्रताप जाधव (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता
रविकांत तुपकर (स्वाभिमानी शेतकरी पक्ष) - तिसऱ्या स्थानी

10. अकोला
अभय पाटील (काँग्रेस) - जिंकू शकतात 
अनुप धोत्रे (भाजप) - पराभवाची शक्यता
प्रकाश आंबेडकर (वंचित) - तिसऱ्या स्थानी

11. वर्धा
अमर काळे (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
रामदास तडस (भाजप)- पराभवाची शक्यता

12. भंडारा-गोंदिया
प्रशांत पडोळे (काँग्रेस) - जिंकू शकतात
सुनील मेंढे (भाजप) - पराभवाची शक्यता

13. गडचिरोली चिमूर
नामदेव किरसान (काँग्रेस) - जिंकू शकतात
अशोक नेते (भाजप) - पराभवाची शक्यता

14. चंद्रपूर
प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) - जिंकू शकतात
सुधीर मुनगंटीवार (भाजप) - पराभवाची शक्यता

15. यवतमाळ वाशिम 
संजय देशमुख  (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
राजश्री पाटील (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता

 

हे ही वाचा>> फडणवीस-पवारांची प्रतिष्ठा पणाला, माढ्यात कोण उधळतंय गुलाल?

 

16. हिंगोली
नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
बाबूराव कदम (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता
बी. डी. चव्हाण (वंचित) - तिसऱ्या स्थानी

17. नांदेड
वसंतराव चव्हाण (काँग्रेस) - जिंकू शकतात
प्रतापराव चिखलीकर (भाजप) - पराभवाची शक्यता
अविनाश भोसीकर (वंचित) - तिसऱ्या स्थानी

18. परभणी
संजय (बंडू) जाधव (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
महादेव जानकर (रासप) - पराभवाची शक्यता

19. जालना
कल्याण काळे (काँग्रेस) - जिंकू शकतात
रावसाहेब दानवे (भाजप) - पराभवाची शक्यता
मंगेश साबळे (अपक्ष) - तिसऱ्या स्थानी

20. छत्रपती संभाजीनगर
चंद्रकांत खैरे (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
संदिपान भुमरे (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता
इम्तियाज जलील (MIM) - तिसऱ्या स्थानी

21. धाराशिव
ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
अर्चना पाटील (NCP अजित पवार) - पराभवाची शक्यता

22. लातूर
शिवाजी काळगे (काँग्रेस) - जिंकू शकतात
सुधाकर श्रृंगारे (भाजप) - पराभवाची शक्यता

23. भिवंडी 
सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
कपिल पाटील (भाजप) - पराभवाची शक्यता
निलेश सांबरे (अपक्ष) - तिसऱ्या स्थानी

24. ठाणे
राजन विचारे (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता

25. पुणे
रवींद्र धंगेकर (काँग्रेस) - जिंकू शकतात
मुरलीधर मोहोळ (भाजप) - पराभवाची शक्यता
वसंत मोरे (वंचित) - तिसऱ्या स्थानी

26. बारामती 
सुप्रिया सुळे (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
सुनेत्रा पवार (NCP अजित पवार) - पराभवाची शक्यता

27. शिरूर 
अमोल कोल्हे - (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
शिवाजीराव आढळराव (NCP अजित पवार) - पराभवाची शक्यता

28. अहमदनगर
निलेश लंके (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
सुजय विखे (भाजप) - पराभवाची शक्यता

29. शिर्डी
भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
सदाशिव लोखंडे (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता
उत्कर्षा रुपवते (वंचित) - तिसऱ्या स्थानी

30. सोलापूर
प्रणिती शिंदे (काँग्रेस) - जिंकू शकतात
राम सातपुते (भाजप) - पराभवाची शक्यता

31. माढा
धैर्यशील मोहिते-पाटील (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
रणजीतसिंह निंबाळकर (भाजप) - पराभवाची शक्यता

32. सातारा 
शशिकांत शिंदे (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
उदयनराजे भोसले (भाजप) - पराभवाची शक्यता

33. कोल्हापूर 
शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस) - जिंकू शकतात
संजय मंडलिक (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता

34. हातकणंगले
सत्यजीत पाटील (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता
राजू शेट्टी (शेतकरी स्वाभिमानी पक्ष) - तिसऱ्या स्थानी

Rudra Research च्या एक्झिट पोलनुसार भाजप आणि महायुती किती मतदारसंघात विजय मिळेल? 

Rudra Research च्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला राज्यात 48 पैकी केवळ 13 जागा मिळतील. ज्यामध्ये शिवसेना (शिंदे गट) 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा आणि भाजपला 9 जागांवर विजय मिळेल. 

1. रावेर
रक्षा खडसे (भाजप) - जिंकू शकतात
श्रीराम पाटील (NCP शरद पवार) - पराभवाची शक्यता

2. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
नारायण राणे (भाजप) - जिंकू शकतात
विनायक राऊत (शिवसेना ठाकरे गट) - पराभवाची शक्यता

3. मावळ
श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट) - जिंकू शकतात
संजोग वाघेरे (शिवसेना ठाकरे गट) - पराभवाची शक्यता

4. रायगड
सुनील तटकरे (NCP अजित पवार) - जिंकू शकतात
अनंत गीते (शिवसेना ठाकरे गट) - पराभवाची शक्यता

5. कल्याण
श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट) - जिंकू शकतात
वैशाली दरेकर (शिवसेना ठाकरे गट) - पराभवाची शक्यता

6. पालघर
हेमंत सावरा (भाजप) - जिंकू शकतात
भारती कामडी (शिवसेना ठाकरे गट) - पराभवाची शक्यता
राजेश पाटील (बविआ) - तिसऱ्या स्थानी

7. बीड
पंकजा मुंडे (भाजप) - जिंकू शकतात
बजरंग सोनावणे (NCP शरद पवार) - पराभवाची शक्यता

8. नागपूर 
नितीन गडकरी (भाजप) - जिंकू शकतात
विकास ठाकरे (काँग्रेस) - पराभवाची शक्यता

9. रामटेक 
राजू पारवे (शिवसेना शिंदे गट) - जिंकू शकतात
श्यामकुमार बर्वे (काँग्रेस) - पराभवाची शक्यता
किशोर गजभिये (अपक्ष) - तिसऱ्या स्थानी

10. अमरावती
नवनीत राणा (भाजप) - जिंकू शकतात
बळवंत वानखेडे (काँग्रेस) - पराभवाची शक्यता
दिनेश बूब (प्रहार) - तिसऱ्या स्थानी

11. जळगाव
स्मिता वाघ (भाजप) - जिंकू शकतात
करण पवार (शिवसेना ठाकरे गट) - पराभवाची शक्यता

12. धुळे
सुभाष भामरे (भाजप) - जिंकू शकतात
शोभा बच्छाव (काँग्रेस) - पराभवाची शक्यता

13. मुंबई उत्तर  
पियुष गोयल (भाजप) - जिंकू शकतात
भूषण पाटील (काँग्रेस) - पराभवाची शक्यता

    follow whatsapp