Amravati Lok Sabha : शरद पवारांचा नवनीत राणांविरोधात 'सातारा पॅटर्न', मेसेज काय?

Sharad Pawar Navneet Rana : अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा भाजपकडून कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आणि शरद पवार.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणांना उमेदवारी दिली आहे.

भागवत हिरेकर

• 03:35 PM • 22 Apr 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

अमरावती लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

शरद पवार यांनी मागितली अमरावतीकरांची माफी

point

अमरावतीत महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात

Sharad Pawar On Navneet Rana, Amravati Lok Sabha Latest Update : भाजपच्या तिकिटावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या नवनीत राणांविरोधात शरद पवारांनी सातारा पॅटर्न अवलंबला! बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेत पवारांनी अमरावतीकरांसमोर चूक कबूल करत स्पष्ट मेसेज दिला. नेमकं पवार काय बोलले? (Sharad Pawar made an important statement that we made a mistake by supporting Navneet Rana in Lok Sabha Election 2024)

हे वाचलं का?

शरद पवारांनी या सभेत भाषण करताना पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. नरेंद्र मोदींच्या रुपाने देशात नवीन पुतिन तयार होतोय की, काय अशी देशातील जनतेला चिंता वाटत आहे, असे मोठे विधान पवारांनी केले. नवनीत राणांबद्दल बोलताना पवारांनी चूक झाली ती दुरूस्त करायला आलोय असे सांगितले. 

शरद पवार काय बोलले?

"आज या ठिकाणी मी आलो, ते एक गोष्ट सांगण्यासाठी... मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. एक चूक माझ्याकडून झाली. पाच वर्षापूर्वीची जी निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला. आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, त्यांना खासदार केलं."

हेही वाचा >> शिंदे-ठाकरेंच्या जीवाला घोर; 'हा' फॅक्टर ठरवणार खासदार!

"गेल्या पाच वर्षातील त्यांचा अनुभव हा बघितल्यानंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की, कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की, आमच्याकडून चूक झाली. ती चूक पुन्हा कधी होणार नाही. ती चूक आता दुरुस्त करायची आहे. आणि ती चूक दुरुस्त करण्यासाठी ज्याचं सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाच्या हिताचा विचार करणारं, अशा बळवंतराव वानखेडेंना तुम्ही मोठ्या मताने विजयी करा. हे सांगण्यासाठी मी इथे आलोय", असे शरद पवार म्हणाले. 

2019 मध्ये साताऱ्यात काय म्हणाले होते पवार?

शरद पवारांनी 2019 मध्ये केलेल्या त्या भाषणाची कायम चर्चा होते. त्या भाषणाने निवडणूक फिरली आणि उदयनराजेंचा पराभव झाला, असे म्हणतात. त्या भाषणात पवार नेमके काय बोलले होते?

हेही वाचा >> "चहाच्या टपरीवर असताना उद्धव ठाकरेंनी दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर"

"चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली. हे मी जाहीरपणे साताऱ्यात कबूल करतो. ती चूक दुरुस्त करण्यासाठी साताऱ्यातील घराघरातील तरुण, वडिलधारी सगळेजण 21 ऑक्टोबरची वाट पाहात आहेत. ते मतदानाच्या दिवशी आपल्या मताचा निर्णय घेऊन श्रीनिवास पाटलांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील. यातून सातारकर आम्ही लोकांनी जी काही चूक केली त्याबाबत जो निर्णय घ्यायचा तो घेतील."

    follow whatsapp