Supriya Sule on Baramati Lok Sabha election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होताना दिसत आहे. सुप्रिया सुळे यांच्यासमोर यावेळी पवारांचंच आव्हान उभं आहे. अजित पवारांनी सुनेत्रा पवारांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना सुप्रिया सुळेंनी काही मुद्द्यावर भाष्य केलं.
ADVERTISEMENT
'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळेंनी तीन वेळा निवडून आणण्यात अजित पवारांचं योगदान खूप मोठं होतं, असं म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे अजित पवारांबद्दल काय बोलल्या?
अजित पवारांच्या विरोधातील भूमिकेबद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या, "अजित पवारांना पोल मॅनेजर असं म्हणणार नाही, पण अर्थातच... मला तीन वेळा निवडून आणण्यात अजित पवारांचं खूप मोठं होतं. भरणे मामांचं होतं. थोरातांचं होतं. हर्षवर्धन भाऊंचं होतं. राहुल कुल यांचं होतं. अनेक नाव मी घेऊ शकते. कारण की माझं म्हणणं आहे की, ज्याने आपल्याला मदत केली, त्याला कधीही विसरू नये आणि हे माझ्या आईने माझ्यावर केलेले संस्कार आहेत."
हेही वाचा >> "संजय राऊत मुख्य सूत्रधार, त्यांना अटक करा", निरुपमांच्या आरोपाने खळबळ
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हे लोक आज माझ्या विरोधात आहेत, पण याच्या मागेही खूप मोठं षडयंत्र आहे. आणि चंद्रकांत दादांचे (चंद्रकांत पाटील) आभार मानते की, खरंच ते बोलतात. त्यांनी असं एक वक्तव्य केलंय की, ही पूर्ण निवडणूक आम्ही शरद पवारांना संपवण्यासाठी लढतोय. त्याच्यात ना विकास आहे, ना बेरोजगारी, ना महागाई आहे. काहीही नाहीये. त्यांना शरद पवारांना संपवायचं आहे, हे एकच धोरण आणि षडयंत्र त्यांनी केलेलं आहे."
हेही वाचा >> "शिंदेंवर खूप दबाव...", तिकीट कापल्यानंतर तुमानेंनी सोडलं मौन
मोठा भाऊ म्हणून मानसन्मान केला -सुप्रिया सुळे
अजित पवारांनी सुप्रिया सुळे या मतदारसंघात नसतात, असा आरोप केला. त्याला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मला माहितीये की, मी काय केलं आहे. पण, दुर्दैव आहे की गैरअर्थ कसे काढले जातात. माझ्यावर झालेल्या संस्काराप्रमाणे मोठा भाऊ हा घरातील कर्ता पुरुष असतो; वडिलांच्या नंतर कोण असतं, तर मोठा भाऊ असतो. मोठ्या भावाचा मानसन्मान करूनच आपण मर्यादेत राहायचं असतं. त्यामुळे मोठा भाऊ म्हणून मी अनेक गोष्टी मान सन्मानाने केल्या. त्यांच्याच नाही, तर दिलीप वळसे, छगन भुजबळ यांचाही मानसन्मान केला.
ADVERTISEMENT