Saroj Patil : "शरद पायाला भिंगरी लावून...", बारामतीच्या सभेत सरोज पाटील नेमकं काय म्हणाल्या?

मुंबई तक

15 Nov 2024 (अपडेटेड: 15 Nov 2024, 02:28 PM)

Saroj Patil On Sharad Pawar: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच बारामती विधानसभा मतदारसंघात काल गुरुवारी निर्भय बनोची सभा पार पडली.

Saroj Patil On Sharad Pawar

Saroj Patil Latest Speech

follow google news

बातम्या हायलाइट

point

"फक्त हसन मुश्रीफला पाडायचंय..."

point

सरोज पाटील बारामीतच्या भाषणात काय म्हणाल्या?

point

निर्भय बनोच्या सभेत सरोज पाटील यांनी केलं मोठं विधान

Saroj Patil On Sharad Pawar: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच बारामती विधानसभा मतदारसंघात काल गुरुवारी 'निर्भय बनो'ची सभा पार पडली. यावेळी एनडी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी मोठं विधान केलं. "हा महाराष्ट्र शाहू-फुले आंबेडकरांच्या विचारांवर प्रेम करणारा आहे. शरद पवार पायाला भिंगरी लावून फिरतोय, याचं मला वाईट वाटतं. तब्येत बरी नाही तरीही बिचारा फिरतोय, मग आपण घरात कसं बसायचं? माझ्यात ताकद नाही, तरी मी कोल्हापूरला फिरते. मला खात्री आहे. आमचे जयंत पाटील, विश्वजीत, समरजीत हे सर्व लोक निवडून येणार आहेत, असं सरोज पाटील म्हणाल्या. 

हे वाचलं का?

जनतेला संबोधीत करताना सरोज पाटील पुढे म्हणाल्या, "फक्त हसन मुश्रीफला पाडायचंय. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सध्या महाराष्ट्र हा अंधारात चाचपडतंय. प्रतिगामी शक्ती डोकं वर काढतायत. त्यामुळे अतिशय वाईट वाटतं आणि दु:ख होतं. काय होता महाराष्ट्र आणि आता कसा झाला आहे, हे पाहून रातोरात झोप लागत नाही. अस्वस्थ झाले आहे". 

हे ही वाचा >> Raj Thackeray : मनसेच्या जाहीरनाम्यात काय काय? मोफत योजनांबद्दल काय म्हणाले राज ठाकरे?

आमच्या पिढीला आई वडिलांनी किती सुंदर विचार दिले. किती सुंदर आदर्श ठेवला आमच्यापुढे. पण आम्ही आमच्या मुलांपुढे हा पुरोगामी विचार ठेऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला लढलं पाहिजे. मला महिलांना सांगायचं की, तुमची मुलं काय करतात यावर लक्ष ठेवा. भिडे मुलांना पैसे देतो. दारु देतो आणि भाजपचा प्रचार करायला सांगतो. आपली मुलं त्याच्या कचाट्यात सापडतात.

हे ही वाचा >> EVM Hacking : "53 कोटी रुपये द्या, 65 जागा जिंकवून देतो...", मविआ खासदाराला फोन, ईव्हीएम हॅकींगचा दावा

मी आमच्या कॉलेजमध्ये अतिशय विद्यार्थ्यांना जागृत केलं आहे. आपला मुलगा कुणाच्या संगतीत आहे, हे लक्ष ठेवा. भाजप सोडून कुणालाही मतदान करा. हे नालायक लोक आहेत. आमचा जन्म पारतंत्र्यात झाला. त्यावेळी नाना पाटील घरात लपून बसायचे. जाताना त्यांना पैसे द्यायचे. घरात दम द्यायचे. पण आमची आई म्हणायची की, जे समाजाचा संसार करतात. त्याचा संसार समाजानं केलं पाहिजे. आमच्या आई वडिलांचे एनडी हे सर्वात लाडके जावई होते, असंही सरोज पाटील म्हणाल्या. 

    follow whatsapp