Devendra Fadnavis Interview: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा चांगलं मताधिक्य मिळालं. जून ते नोव्हेंबरमध्ये काय बदल केले आहेत? विधानसभेत तुम्हाला चांगलं यश मिळेल, असा दावा तुम्ही करत आहात, महायुतीचं सरकार येईल असं तुम्हाला वाटतंय का? या प्रश्नांचं उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले, "परिस्थिती बदलली आहे. काँग्रेस आणि त्यावेळच्या आघाडी सरकारने विचारधारेला प्रदुषीत करण्याचं काम, फेक नरेटिव्ह चालवण्याचं काम केलं होतं. आम्ही आता त्यांचा चेहरा खुला केला आहे. आम्ही दोन कारणांमुळे लोकसभा निवडणूक हरलो. संविधान बदलणार, आरक्षण जाणार या प्रकारच्या गोष्टी पसरवण्यात आल्या. महाराष्ट्रात आमच्याकडून चूक झाली. ज्या प्रकारे नरेटिव्ह पसरलं, त्या नरेटिव्हला थांबवण्याची व्यवस्था आम्हाला करता आली नाही. त्यामुळे या निवडणुकीत आमचं मतं दुसरीकडे गेली", असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केलं.
ADVERTISEMENT
फडणवीस काँग्रेसवर हल्लाबोल करत पुढे म्हणाले, "काँग्रेस आघाडी सरकारने ज्याप्रकारे वोट जिहादचा प्रयत्न केला. मसलन धुलियासारखी एक जागेवर सहापैकी पाच मतदारसंघात आम्ही एक लाख नव्वद हजारांनी पुढे होतो. मालेगाव सेंट्रलमध्ये अशाप्रकारे मतदान झालं की, आम्ही 1 लाख 94 हजारांनी पिछाडीवर गेलो आणि 4 हजार मतांनी हरलो. अशा 12 जागा आहेत, ज्यांमध्ये एक किंवा दीड अल्पसंख्यांक जागांमुळे आमचा पराभव झाला. नंतर आमच्या लक्षात आलं की, नेत्यांनी धार्मिक स्थळावरून आवाहन करत एकप्रकारे वोट जिहाद केलं गेलं".
हे ही वाचा >> Raj Thackeray : मनसेच्या जाहीरनाम्यात काय काय? मोफत योजनांबद्दल काय म्हणाले राज ठाकरे?
आता या दोन्ही गोष्टी शक्य नाहीयत. आता लोकांनाही माहित झालंय की आरक्षण देणारे मोदी, आरक्षण काढणारे नाहीत. त्यामुळे तो मतदार आमच्याकडे परत आला आहे. हे लोक पुन्हा वोट जिहादचा प्रयत्न करत आहेत. पण एक मतदारसंघ पाच मतदारसंघांना हरवू शकत नाही. यामुळे इतर लोकही सावध झाले आहेत. मला आता वाटतंय की परिस्थिती बदलली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील सहा महिन्यात आम्ही ज्याप्रकारे योजना सुरु केल्या. इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प खुले केले, त्यामुळे लोकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे जनता आम्हाला निवडून देणार आहे, असंही फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा >> EVM Hacking : "53 कोटी रुपये द्या, 65 जागा जिंकवून देतो...", मविआ खासदाराला फोन, ईव्हीएम हॅकींगचा दावा
ADVERTISEMENT