Modi New Cabinet : भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 'कॅबिनेट मंत्रिपद' का दिलं नाही?

भागवत हिरेकर

09 Jun 2024 (अपडेटेड: 09 Jun 2024, 06:35 PM)

Ajit Pawar on Modi New Cabinet : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रिपद मिळाले नाही. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रिपद का दिले नाही?

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोदींच्या मंत्रिमंडळात एकही जागा नाही.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस.

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात स्थान नाही

point

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हवे कॅबिनेट मंत्रिपद

point

प्रफुल्ल पटेल यांना दिली जाणार होती संधी

Ajit Pawar NCP Modi Cabinet : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून कुणीही नसणार, हे स्पष्ट झाले आहे. भाजपने राज्यमंत्रिपद (स्वतंत्र प्रभार) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिले होते. पण, हा प्रस्ताव अजित पवारांच्या पक्षाने नाकारला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कॅबिनेट मंत्रिपद का दिले नाही, याबद्दलचे कारण आता समोर आले आहे. (Why did BJP not give cabinet minister post to Ajit Pawar's NCP?)

हे वाचलं का?

भाजपकडे कॅबिनेट मंत्रि‍पदाची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. पण, भाजपने ते शक्य नसल्याचे सांगितले. नेमकी काय चर्चा झाली, याबद्दल अजित पवारांनी इनसाईड स्टोरी सांगितली.

दिल्लीत माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "लोकसभेचा निकाल लागल्यानंतर एनडीएची लगेच बैठक बोलवण्यात आली होती. म्हणजे ४ जूनला निकाल लागले आणि ५ जूनला बैठक बोलवली होती. मला काही येता आलं नाही. मी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना बैठकीला जाण्यासाठी सांगितलं. त्यामुळे दोघे बैठकीला आले होते." 

अजित पवारांनी सांगितला सगळा घटनाक्रम

"चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे संख्याबळ जास्त असल्याने त्यांच्या दोघांच्या म्हणण्याला महत्त्व प्राप्त झाले होते. त्याच्याआधी माध्यमात वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. त्यावेळी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी स्वतः सांगितलं की, दिवस वाया घालू नका. ताबडतोब एनडीएची बैठक घ्या. नरेंद्र मोदींची निवड करू", असा घटनाक्रम अजित पवारांनी सांगितला.

हेही वाचा >> अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नाकारलं मंत्रिपद, काय बिनसलं? Inside Story  

राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार पुढे म्हणाले की, "७ जून रोजी एनडीएची बैठक झाली. आम्ही सगळे आलो होतो. एनडीएतील घटक पक्षांचे सगळे प्रमुख नेते... नड्डा, राजनाथ सिंह, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, अमित शाह असे सगळे मिळून आम्ही राष्ट्रपतींकडे गेलो. आम्ही एनडीएच्या घटक पक्षाचे पत्र सादर केले. पाठिंब्याचे पत्र दिले." 

आमच्या दोन-तीन जागा वाढताहेत -अजित पवार

"जे.पी. नड्डा यांच्या घरी बैठक झाली. त्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वतीने मी त्यांना सांगितलं की, जरी राष्ट्रवादीची एकच जागा आली असली, तरी राज्यसभेची एक जागा आहे आणि दोन-तीन महिन्यामध्ये आमच्या राज्यसभेच्या अजून दोन जागा वाढताहेत. राष्ट्रवादीच्या एकूण जागा चार होताहेत. हे आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिले. कॅबिनेटमध्ये एक जागा मिळाली पाहिजे, असे सांगितले", अशी माहिती अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा >> महाराष्ट्रातील 'हे' नेते होणार मंत्री, शिंदेंकडून कुणाला संधी?  

"काल (8 जून ) मला त्यांचा कॉल आला. तिघांशी पण वेगवेगळं बोललो. त्यांनी सांगितलं की, लोकसभेचा विचार करता तुमचा एक खासदार निवडून आलेला आहे. अनेक घटकपक्ष कमी संख्येने निवडून आले आहेत. परंतू, एनडीएचे घटक म्हणून आम्ही प्रत्येकाला मंत्रिमंडळात घेण्याचा प्रयत्न करतोय", अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांना काय सांगितलं?  

अजित पवार पुढे म्हणाले की, "काहींचे सदस्यही नाहीत. पण, ते राज्यसभेचे सदस्य आहेत आणि सोशल इंजिनिअरिंग म्हणून त्यांनाही मंत्रिमंडळात घेण्याचं ठरवलं आहे. पण, त्यांना कॅबिनेट मंत्री न करता स्वतंत्र प्रभार द्यायचा अशा पद्धतीने आमचे ठरले आहे. त्यापद्धतीने आम्ही तुम्हाला एक जागा स्वतंत्र प्रभार असलेली देतो. ती तुम्ही घ्या."

हेही वाचा >> पुण्याचे माजी महापौरांची मोदींच्या मंत्रिमंडळात एन्ट्री, मुरलीधर मोहोळांचा राजकीय प्रवास 

"आम्ही त्यांना सांगितलं की, आमचं ठरलं आहे की कॅबिनेटची जागा घेऊन प्रफुल्ल पटेल यांना द्यायची. पटेलांनी अनेकदा कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे तुम्ही कॅबिनेट मंत्रिपद दिलं तर जास्त संयुक्तिक होईल. ते म्हणाले की, आम्हाला सगळ्यांनाच बरोबर घेऊन जायचे आहे. आम्ही एनडीएतील घटक पक्षांची संख्या कमी असली, तरी स्वतंत्र प्रभार देतोय. मग जर अशी तफावत केली तर ते योग्य राहणार नाही, असे आमचे मत आहे. आम्ही त्यांना सांगितलं की, आम्हाला द्यायचं असेल, तर कॅबिनेट मंत्रिपद द्यावे नाहीतर, आमची थांबण्याची तयारी आहे. एनडीएला पाठिंबा देऊ. आमच्या मनात दुसरे काही नाही", अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.  

    follow whatsapp