Zaheer khan झाला बाबा, लग्नाच्या 8 वर्षानंतर सागरिका घाटगेने दिला बाळाला जन्म, नाव ठेवलं...

क्रिकेटपटू झाहीर खान आणि अभिनेत्रा सागरिका घाटगे यांनी त्यांच्या मुलाला जन्म दिला. या जोडप्याने यासंबंधी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांच्या कुटूंबातील नवीन सदस्याचे स्वागत केले आहे

झाहीर खान आणि अभिनेत्रा सागरिका घाटगे यांनी दिला मुलाला जन्म

झाहीर खान आणि अभिनेत्रा सागरिका घाटगे यांनी दिला मुलाला जन्म

मुंबई तक

16 Apr 2025 (अपडेटेड: 16 Apr 2025, 12:18 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

झाहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी दिला मुलाला जन्म

point

झाहीर आणि सागरिकाच्या मुलाचे नाव काय?

point

झाहीर आणि सागरिकाने इंस्टाग्रामवर केला खुलासा

Zaheer Khan and Sagarika Baby: मुंबई: सुप्रसिद्ध क्रिकेटपटू झाहीर खान आणि अभिनेत्रा सागरिका घाटगे यांनी नुकताच त्यांच्या मुलाला जन्म दिला. या जोडप्याने यासंबंधी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांच्या कुटूंबातील नवीन सदस्याचे स्वागत केले आहे. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव फतेहसिंह खान ठेवल्याचे इंस्टाग्राम पोस्टवरुन दिसत आहे. 

हे वाचलं का?

इंस्टाग्राम शेअर केली पोस्ट

या जोडप्याने बुधवारी इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आणि त्यांच्या मुलाच्या आगमनाची घोषणा केली. या जोडप्याने त्यांच्या गोड मुलासोबत त्यांच्या कुटुंबाचा सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये झाहीर खानने त्याच्या मुलाला मांडीवर धरलेले दिसत आहे तर सागरिका झाहीरच्या खांद्यांवर हात ठेवून उभी असल्याचं दिसत आहेत. या फोटोमध्ये दोघे खुपच आनंदी असल्याचं सुद्धा दिसत आहे.

हे ही वाचा: अजित पवारांची होणारी सून ऋतुजा पाटील नेमकं काय करते?

झाहीर आणि सागरिकाने काय म्हटले?

हा सुंदर फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, "प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादाने आम्ही आमच्या गोंडस मुलाचे म्हणजेच फतेहसिंह खानचे स्वागत करतो."

हे ही वाचा: Astro: कपाळावर टिळा लावल्याने बदलतं नशीब! तुम्हालाही होईल प्रचंड फायदा

नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

झाहीर आणि सागरिकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पोस्टवर कमेंट करत चाहते त्या दोघांचं अभिनंदन करत आहेत. या पोस्टवर अंगद बेदीने कमेंट करत लिहिले, "वाहेगुरू" तसेच, हरभजन सिंगने "तुम्हा दोघांचे अभिनंदन" असे लिहिले. याव्यतिरिक्त, अनेक मंडळींनी आणि चाहत्यांनी सागरिका आणि झाहीरने मुलाला जन्म दिल्यामुळे त्यांचे अभिनंदन करत आहेत. 


 

    follow whatsapp