Ravindra Waikar : ठाकरेंना बसणार मोठा झटका, वायकर कोणत्याही क्षणी शिंदेंच्या शिवसेनेत!

ऋत्विक भालेकर

• 05:38 PM • 10 Mar 2024

Ravindra Waikar Latest News : आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

आमदार रवींद्र वायकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची निश्चित झाले आहे.

उद्धव ठाकरे यांना निवडणुकीच्या तोंडावर झटका बसणार आहे. रवींद्र वायकर हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती.

follow google news

बातम्या हायलाइट

point

रवींद्र वायकर यांचे शिंदेंच्या सेनेत जाणे जवळपास निश्चित

point

उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बसणार धक्का

point

एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत करणार प्रवेश

Ravindra Waikar Shiv sena : उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय नेत्यांपैकी एक असलेले आमदार रवींद्र वायकर कोणत्याही क्षणी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाणार असल्याची सूत्रांनी दिली आहे. रवींद्र वायकरांनी साथ सोडल्यास ठाकरेंना हा लोकसभा निवडणुकीच्या हा मोठा धक्का असणार आहे. (Ravindra Waikar most likely to join CM Shinde camp)

हे वाचलं का?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र वायकर हे आज (१० मार्च) रात्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर हा पक्ष प्रवेश कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे उद्धव ठाकरे पक्षबांधणी करत असताना आणखी एक धक्का बसणार आहे. 

भूखंड घोटाळा प्रकरणामुळे लांबला प्रवेश?

रवींद्र वायकर यांच्यावर मुंबईतील जोगेश्वरी येथील आरक्षित भूखंडावर नियमबाह्य हॉटेलचे बांधकाम केल्याचा आरोप आहे. २०२२ मध्ये सोमय्यांनी हा आरोप केल्यापासून हे प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर महिन्यात रवींद्र वायकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याच आधारावर ईडीनेही गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे. 

याचदरम्यान वायकर हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीखही निश्चित झाल्याचे म्हटले गेले होते. पण, या प्रकरणामुळे पक्षप्रवेश लांबल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

हेही वाचा >> Ravindra Waikar यांना मोठा दिलासा, भूखंड घोटाळ्याविरोधात BMC करणार पुनर्विचार 

या प्रकरणात मुंबई महापालिका सुरुवातीपासूनच रवींद्र वायकर यांच्याविरोधात भूमिका घेताना दिसली. मात्र, अचानक महापालिकेने भूमिका बदलत वायकर यांनी दिलेल्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्यास अनुकूलता दर्शवली. सुप्रीम कोर्टात बीएमसीने तशी भूमिका मांडल्याने हे प्रकरण निकाली निघाले आहे. त्यानंतर आता वायकर हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.

हेही वाचा >> ''ठाकरेंच सरकार आलं तरी मला काही मिळणार नाही''

रवींद्र वायकर हे 1992 मध्ये पहिल्या मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2006 मध्ये ते बीएमसीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बनले होते. त्यानंतर जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून 2009, 2014, 2019 असे तीन वेळा ते आमदार बनले. 

महाविकास आघाडी सरकारमध्ये वायकर राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण ही खाती होती. 

    follow whatsapp