TMC List : युसूफ पठाण काँग्रेसच्या नेत्याविरोधात लोकसभेच्या मैदानात, 42 जणांची यादी जाहीर

भागवत हिरेकर

10 Mar 2024 (अपडेटेड: 10 Mar 2024, 04:36 PM)

TMC Lok Sabha Candidate List : टीएमसीने युसूफ पठाण यांना तिकीट दिले आहे. अधीर रंजन यांच्याविरोधात उभे केले आहे. ममता बॅनर्जींच्या उमेदवारांची यादी पहा.

तृणमूल काँग्रेसने अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात युसूफ पठाणला उमेदवारी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने युसुफ पठाणला उमेदवारी देण्यात आली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

तृणमूल काँग्रेसने जाहीर केले उमेदवार

point

क्रिकेटपटू युसूफ पठाणला ममता बॅनर्जींनी दिली उमेदवारी

point

अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात तृणमूलचा उमेदवार ठरला

TMC candidate List Lok Sabha election 2024 : तृणमूल काँग्रेसने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने 42 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

हे वाचलं का?

जगदीश चंद्र बसुनिया यांना कूचबिहार लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात बहरामपूरमधून क्रिकेटर युसूफ पठाण यांना तिकीट देण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसने कूचबिहार लोकसभा मतदारसंघातून जगदीश चंद्र बसुनिया यांना उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा >> "शिल्लक शिवसेनेचे अध्यक्ष", थेट ठाकरेंवरच वार; मविआमध्ये उफाळला वाद

उमेदवारांच्या घोषणेच्या वेळी, लोकांच्या नजरा बसीरहाट लोकसभा मतदारसंघावर होत्या कारण ज्या संदेशखली भागात हिंसा घडली, तो भाग या लोकसभा मतदारसंघात येतो. या जागेवरून अभिनेत्री नुसरत जहाँ २०१९ मध्ये जिंकल्या होत्या. यावेळी तृणमूल काँग्रेसने त्यांचे तिकीट कापले आहे. टीएमसीने हाजी नुरुल इस्लाम यांना उमेदवारी दिली आहे. तृणमूलने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी पुढीलप्रमाणे...

हेही वाचा >> भाजपला धक्का! खासदाराने काँग्रेसमध्ये केला प्रवेश

1- कूचबिहार (SC)- जगदीश चंद्र बसुनिया
2- अलीपुरद्वार (ST)- प्रकाश चिक बडाइक
3- जलपाईगुडी (SC)- निर्मल चौधरी रॉय
4- दार्जिलिंग- गोपाल लामा
5- रायगंज- कृष्णा कल्याणी
6- बालुरघाट- बिप्लब मित्र
7- मालदा उत्तर- प्रसून बॅनर्जी
8- मालदा दक्षिण- शाहनवाज अली रायहान
9- जंगीपूर- खलीलूर रहमान
10- बेरहामपूर- युसूफ पठाण
11- मुर्शिदाबाद- अबू ताहेर खान
12- कृष्णनगर- महुआ मोईत्रा
13- राणाघाट (SC)- मुकुट मणी अधिकारी
14- बोनगाव- विश्वजित दास
15- बराकपूर- पार्थ भौमिक
16- दम दम- प्रोफेसर सौगता रॉय
17- बारासात- काकोली घोष दस्तीदार
18- बसीरहाट- नूरुल इस्लाम
19- जॉयनगर (SC)- प्रतिमा मंडळ
20- मथुरापूर (SC)- बापी हलदर
21- डायमंड हार्बर- अभिषेक बॅनर्जी
22- जादवपूर- सयोनी घोष
23- कोलकाता दक्षिण- माला रॉय
24- कोलकाता उत्तर- सुदीप बंदोपाध्याय
25- हावडा- प्रसून बॅनर्जी
26- उलुबेरिया- सजदा अहमद
27- सेरामपूर- कल्याण बॅनर्जी
28- हुगळी- रचना बॅनर्जी
29- आरामबाग (SC)- मिताली बाग
30- तमलूक- देबंगशु भट्टाचार्य
31- कंठी- उत्तम बारीक
32- घाटल- दीपक अधिकारी (देव)
33- झारग्राम (ST)- कालीपदा सोरेन
34- मेदिनीपूर- जून मलिया
35- पुरुलिया- शांतीराम महतो
36- बांकुरा- अरुप चक्रवर्ती
37- बिष्णुपूर (SC)- सुजाता मंडळ
38- वर्धमान पूर्व (SC)- डॉ. शर्मिला सरकार
39- वर्धमान दुर्गापूर- कीर्ती आझाद
40- आसनसोल- शत्रुघ्न सिन्हा
41- बोलपूर (SC)- असितकुमार मल
42- बीरभूम- शताब्दी दंगल

अर्जुन सिंह यांना पक्षाने तिकीट न दिल्याने ते टीएमसीवर नाराज आहेत. आपले नाव यादीत नसल्याचे समजताच ते रॅलीतून निघून गेले.
 

    follow whatsapp