Dhananjay Powar Eviction :डीपी दादा अर्थात धनंजय पोवार हे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहे. त्यामुळे आता निक्की, अभिजीत आणि सूरज हे तीन सदस्य टॉप थ्रीमध्ये पोहोचले आहे. आता या तिघांमधून कोण बिग बॉसची ट्रॉफी जिंकतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
निक्की, अभिजीत, सूरज आणि धनंजय पोवार यांच्यात एविक्शन पार पडलं. प्रत्येक सदस्याकडे एक लिफाफा देण्यात आला होता. सूरूवातीली अभिजीतच्या बायकोने लिफाफा उघडला. त्यात तो टॉप थ्री मध्ये पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर सूरजने लिफाफा उघडला, त्यात तो देखील टॉप थ्री मध्ये पोहोचला. शेवटी निक्की आणि धनंजय पोवार उरले आहेत.आणि भाऊंनी दोघांना एकत्र लिफाफा उघडण्यास सांगितला. त्यात निक्की टॉप थ्रीमध्ये पोहोचली होती. तर धनंजय पोवार हे एलिमिनेट झाले होते. त्यामुळे धनंजय पोवांरांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.
हे ही वाचा : Bigg Boss Marathi 5 Grand Finale : सूरज, निक्कीला मिळणार गुलीगत धोका? 'हा' सदस्य उंचावणार बिग बॉसची ट्रॉफी?
अशाप्रकारे निक्की, अभिजीत आणि सूरज हे तीन सदस्य टॉप थ्रीमध्ये पोहोचले आहे. आता या तिघांमधून कोण बिग बॉसची ट्रॉफी जिंकतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान याआधी अंकिता प्रभू वालावलकर म्हणजेच 'कोकण हार्टेड गर्ल'चं 'बिग बॉस'च्या घरातून एव्हिक्शन झालेलं आहे. त्यामुळे सूरज, धनंजय, अभिजीत आणि निक्की हे यंदाचे टॉप-४ स्पर्धक ठरले होते.
जान्हवीने घेतली माघार
''मी उद्धट बोलले, मोठ्यांचा अपमान केला. मला माहितीये की, लोकांचा राग शांत झालेला नाहीये. हा गेम आहे आणि हा बिग बॉसने दिलेला एक टास्क आहे. टास्क पूर्ण नाही केला, तर बिग बॉस चिडतात. मी प्रायश्चित म्हणून हा बझर वाजवते आणि हा खेळ सोडते'', असे सांगत जान्हवीने ९ लाखांची पैशांची बॅग उचलून खेळातून माघार घेतली आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी : प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
किती प्राईज मनी मिळणार?
बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाच्या विजेत्यासाठी 25 लाख रुपये बक्षीस ठेवण्यात आलं होतं, पण घरातील सदस्यांनी वेगवेगळ्या टास्कमध्ये ही रक्कम जिंकावी लागणार होती. यानंतर बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी चक्रव्यूह टास्कमध्ये 25 लाख रुपयांपैकी 8.6 लाख रुपये जिंकले होते. त्यानंतर पहिल्या तिकीट टू फिनालेच्या टास्कनंतर बिग बॉस मराठी सीझन 5 च्या विजेत्याला मिळणाऱ्या बक्षिसाच्या रक्कमेत वाढ झाली. या टास्कमध्ये स्पर्धकांना त्यांची किंमत ठरवायची होती. जो सदस्य टास्क जिंकेल त्याची किंमत बक्षिसाच्या रकमेत वाढवण्यात येणार होती. सूरजने हा टास्क जिंकल्यावर त्याची किंमत सहा लाख रुपये बक्षिसाच्या रकमेत जमा झाल्याने बिग बॉस मराठी विजेत्याच्या बक्षिसाठी रक्कम आता 14.6 लाख रुपये झाली आहे.
ADVERTISEMENT