BB Marathi 5: घरातील सदस्यांनी ठरवली एकमेकांची किंमत! जान्हवी तर ढसाढसाच रडली, अन्...

रोहिणी ठोंबरे

30 Sep 2024 (अपडेटेड: 30 Sep 2024, 02:09 PM)

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी सिझन 5 ग्रँड फिनालेचे आयोजन 6 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वचजण या सिझनचा विजेता कोण असणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

6 ऑक्टोंबर रोजी बिग बॉस मराठी सिझन 5 ग्रँड फिनालेचे आयोजन

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी सिझन 5 ग्रँड फिनालेचे आयोजन 6 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वचजण या सिझनचा विजेता कोण असणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता फक्त 6 दिवस उरले आहेत आणि अशातच घरात भांडण, राडे चांगलेच रंगताना दिसत आहेत. कलर्स वाहिनीवर बिग बॉस मराठीचा एक नवा प्रोमो पोस्ट करण्यात आलेला आहे. या प्रोमोमध्ये घरातील सदस्य एकमेकांची किंमत ठरवताना दिसत आहेत. खरं तर हा टास्क असावा. यावेळी जान्हवी प्रचंड संतापून ढसाढसा रडताना दिसत आहे. नेमकं काय घडलंय समजून घेऊया. (big boss marathi season 5 new promo members will decide each others price jahnavi killekar cry a lot )

हे वाचलं का?

सोशल मीडियावर नवीन प्रोमोची तुफान चर्चा होत आहे. बिग बॉसच्या आदेशानुसार स्पर्धकांसाठी एक नवा टास्क आणला आहे. यामध्ये बिग बॉस यांनी सदस्यांना स्वतःची या घरात किती किंमत आहे हे ठरवण्याचा टास्क दिला आहे. या सदस्यांनी ठरवलेल्या किंमतीवर त्यांच्यात वाद झालेला पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Gold Price: सोन्याच्या भावात घसरण! किती रुपयांनी झाले स्वस्त? एका क्लिकवर पाहा आजचे दर

'आज आपल्याला ठरवावी लागणार आहे स्वतःचीच या घरातील किंमत', असं म्हणत बिग बॉसने काही किंमतींचे टॅग्ज स्पर्धकांना दिलेले आहेत. यावेळी अभिजीत स्वतःच मत देत म्हणतो, '2 लाख मी अंकिताला देईन', यावर निक्की अभिजीतला विचारते, 'आणि जान्हवीला चाळीस देणार आहेस का?' यावर अभिजीत म्हणतो, 'माझ्याकडे काहीच पर्याय नाही आहे'. तेव्हा डीपीही अभिजीतला बोलताना दिसतोय की, 'मलाही असंच वाटतंय की तू ती गोष्ट करावी'.

हेही वाचा : Maharashtra Weather: काहीसा ब्रेक तर, कुठे सुरूच... 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार! पाहा पावसाचे अपडेट

पण जान्हवीला ते अजिबात पटलेलं नाही आहे. ती तो टॅग घेऊन फाडून फेकते. 'बिग बॉस माझी या घरातील किंमत चाळीस हजारांची नाही आहे, त्यामुळे मी हे स्वीकारू शकणार नाही.' असं म्हणत जान्हवी ढसाढसा रडते. नेमकं काय घडलं? कोणाला किती किंमतीचे टॅग्ज मिळाले हे आता आजच्या एपिसोडमध्येच समजेल. त्यामुळे आजचा भाग थोडा रंजक असणार आहे.

 

    follow whatsapp