प्रेक्षकांनो! 'Bigg Boss Marathi' पुन्हा पाहायचंय ना? फिनालेआधीच घेतला मोठा निर्णय

मुंबई तक

• 12:50 PM • 29 Sep 2024

Big Boss Marathi Time Changes : प्रत्येकाच्या जीवनात एक बॉस असतो, पण मराठी बिग बॉसने सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवलं आहे. कारण 'बिग बॉस मराठी' सीझन 5 ची सध्या तुफान चर्चा सुरु आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Latest Update

Bigg Boss Marathi Season 5 Time Changed

follow google news

बातम्या हायलाइट

point

'बिग बॉस मराठी' पाहणाऱ्यांनी ही बातमी वाचाच

point

'बिग बॉस मराठी' शोमध्ये नेमकं काय घडलंय?

point

फिनालेआधीच आली सर्वात मोठी अपडेट

Big Boss Marathi Time Changes : प्रत्येकाच्या जीवनात एक बॉस असतो, पण मराठी बिग बॉसने सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवलं आहे. कारण 'बिग बॉस मराठी' सीझन 5 ची सध्या तुफान चर्चा सुरु आहे. बिग बॉसच्या घरात अचानक अशा काही गोष्टी घडतात, ज्या सर्वांना धक्का देणाऱ्या असतात. नुकतच अभिजीत बिचुकलेची घरात एन्ट्री झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बिग बॉसच्या नवीन प्रोमोत अभिजीतची झलक पाहायला मिळाली आहे. त्यामुळे पुढील एपिसोडमध्ये काहीतरी खास गोष्टी घडतील, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण आता बिग बॉस मराठीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

हे वाचलं का?

बिग बॉस मराठीच्या वेळेत बदल, कारण काय?

बिग बॉस मराठी शो तमाम प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कलर्स मराठीवर सुरु असलेल्या बिग बॉसचं प्रेक्षकांना अक्षरक्ष: वेडच लागलं आहे. पण आता याच प्रेक्षकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. कारण बिग बॉस मराठीच्या फिनालेला काही दिवसांचा कालावधी बाकी असताना बिग बॉस मराठीची वेळ बदलण्यात आली आहे. बिग बॉस मराठीची ही वेळ अचानक का बदलण्यात आली? यामागचं कारण जाणून घेऊयात.

हे ही वाचा >>Ladki Bahin Yojana: बहिणींचे पुन्हा होणार लाड! खात्यात 4500 जमा? पण एकदा तुमच्या नावाची यादी तर पाहा

बिग बॉस मराठीच्या फिनालेला सात दिवसांचा कालावधी बाकी आहे. पण आता बिग बॉस मराठीच्या वेळेत मोठा बदल करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. बिग बॉस मराठी आता 3 ऑक्टोबरपासून 9 ऐवजी 9.30 वाजता पाहायला मिळणार आहे. कारण कलर्स मराठी वाहिनीवर 3 ऑक्टोबरपासून 'आई तुळजाभवानी' या नव्या मालिकेचा थरार रंगणार आहे. ही मालिका 3 ऑक्टोबरपासून रात्री 9 वाजता प्ररर्शित होणार आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीची वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अभिजीत बिचुकलेची एन्ट्री अन् बरंच काही..

अभिजीत बिचुकलेच्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील एन्ट्रीच्या प्रोमोनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत बिचुकले नमस्कार करून घरात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अंकिताने सूरजला नॉमीनेट केल्याबद्दल ‘बहीण असं कधीच करत नाही, तुमचा कुचकेपणा दिसला” अशा शब्दात बिचकुले तिचा पाणउतारा करत असल्याचंही या व्हिडीओत पाहू शकता. 

    follow whatsapp