धर्मवीर-2 रिलीजची तारीख ढकलली पुढे, निर्माते म्हणतात; 'जनतेच्या डोळ्यात पाणी...'

मुंबई तक

26 Jul 2024 (अपडेटेड: 26 Jul 2024, 09:37 PM)

dharmaveer 2 release date: "धर्मवीर - २" हा चित्रपटाचं 9 ऑगस्टला प्रदर्शित होणार नसल्याचं निर्माता मंगेश देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. रिलीजची तारीख पुढे ढकलण्याचं नेमकं कारण काय?

धर्मवीर-2 रिलीजची तारीख ढकलली पुढे

धर्मवीर-2 रिलीजची तारीख ढकलली पुढे

follow google news

dharmaveer 2 release date postponed: मुंबई: बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये  प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. (dharmaveer 2 release date postponed what is the reason given by the producer)

हे वाचलं का?

 "धर्मवीर - २" चित्रपटाचा टीजर, गाणी आणि ट्रेलरला सोशल मीडियातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहेत, काही गाव पाण्याखाली गेली असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहता "धर्मवीर - २" हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित करणे योग्य वाटत नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत पाणी असताना, त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी असताना त्याच काळात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू,' असे त्यांनी सांगितले.

"धर्मवीर2" या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेरामॅन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे. काही दिवसांपूर्वीच "धर्मवीर 2" चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले होते. 

"धर्मवीर 2" च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता "धर्मवीर 2" मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार आहे  याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे. 

टीजरमध्ये एक मुस्लिम महिला राखी बांधायला दिघे साहेबांकडे येते. साहेब तिला बुरखा काढायला सांगतात. तिने चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं साहेबांना कळतं आणि साहेब संतापतात. राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त बहिणींना घेऊन साहेब निघतात... त्याचवेळी खास शैलीत साहेब म्हणतात, 'ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की!'  अंगावर काटा आणणाऱ्या या टीजरमधून साहेबांच्या हिंदुत्त्वाची एक झलक पाहायला मिळते. 

    follow whatsapp