Arya Jadhav Slaps Nikki Tamboli : बिग बॉस मराठीमध्ये रोज तुफान राडे पाहायला मिळतात. सध्या आर्या (Arya Jadhav) आणि निक्कीच्या (Nikki Tamboli) राड्याची चर्चा आहे. कारण आर्याने एका टाक्स दरम्यान निक्कीला कानशिलात लगावल्याची माहिती मिळते आहे. या राड्यानंतर आता बिग बॉस (Bigg Boss Marathi) आता आर्याला शिक्षा सुनावणार आहेत. या शिक्षेवरून सोशल मीडियावर मोठा राडा झाला आहे. कारण प्रेक्षकांनी थेट आर्याला घराबाहेर काढल्यास बिग बॉस पाहणे बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आजच्या भागात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (bigg boss marathi season 5 arya jadhav bigg announce today punishment slap nikki tamboli riteish deshmukh bhaucha dhakka)
ADVERTISEMENT
बिग बॉस मराठीमध्ये आज भाऊचा धक्का असणार आहे. या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख आर्याची शाळा घेत, तिला नियम तोडल्याचा जाब विचारणार? तसेच निक्कीला कानशिलात मारल्याप्रकरणी तिला शिक्षा जाहीर करणार आहे. या संबंधित प्रोमो देखील समोर आला आहे. या प्रोमोमध्ये, ''आर्या जेलमधून बाहेर या, तुम्ही स्वत:ला काय समजता. तुम्हाला राग आल्यावर तुम्ही कोणावरही हात उचलणार? आर्या तुम्ही जे केलं ते 100 टक्के इंटेन्शनली केलं. मी बिग बॉसला विनंती करतो त्यांनी आपला निर्णय जाहीर करावा, अशा शब्दात रितेश देशमुख आर्याला झापत तिला शिक्षा सुनावण्याची विनंती करतात.
हे ही वाचा : Video : 'नाही नाही' म्हणत राहिला, पण कुत्र्यांनी सोडलंच नाही...चिमुकल्याचे तोडले लचके!
दरम्यान आर्याने निक्कीला कानशिलात लगावल्यापासून तिला नेमकी काय शिक्षा होणार याची चर्चा सुरु आहे. काही प्रेक्षकांना वाटतंय तिला एकतर जेलमध्ये टाकण्यात येईल? किंवा तिला घराबाहेर काढलं जाईल? या दोन्ही पैकी एखादी शिक्षा आर्याला सुनावतील अशी प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. आजच्या प्रोमोमध्ये काही प्रेक्षकांनी थेट या घटनेवर आर्याचे समर्थन केले आहे. तर काहींनी आर्याला जर घराबाहेर काढलं तर आम्ही बिग बॉस बघणे बंद करणार असा इशारा दिला आहे.
नेमकं काय घडलं?
बिग बॉस मराठीमध्ये गुरूवारी एपिसोड संपताना आपण पाहिलं की, कॅप्टनसी टास्कमध्ये सुरुवातीला निक्कीला रोखण्यासाठी आर्याने बाथरुमचा दरवाजा अडवून ठेवला होता. पुढे दोघींमध्ये झटापट झाली आणि आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. यामुळे अरबाज, वैभव, जान्हवी आणि सर्वांनीच आर्याला दोष दिला. नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. यामध्ये घरातील मूलभुत नियमांचं उल्लंघन केल्याने बिग बॉस आर्याला मोठी शिक्षा देणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसलेला दिसतोय.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : तिसऱ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार?
अरबाजच्या 'त्या' चुकीवर वेधलं लक्ष्य
दरम्यान या घटनेनंतर एकाने कमेंटमध्ये लिहिलंय, "आर्या अभिनंदन तमाम महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केलीस!". दुसऱ्याने म्हटलंय, "अरबाजने जान्हवीचा आणि पंढरीचा हात पिरगळला". तसेच "अभिजीतला पण जोरात धक्का दिला. त्याला पण शिक्षा झाली पाहिजे". तिसऱ्याने म्हटलंय, "आर्याला जर शिक्षा झाली तर अरबाज निक्की आणि जान्हवीला पण व्हायला पाहिजे". आणखी एकाने लिहिलंय, "जर आर्या चुकीची ठरली असेल तर, अरबाजचा पण ताबा सुटला होता. त्यानेही अभिजितला चुकीच्या पद्धतीने धक्का दिला आहे, त्याला शिक्षा करा.आम्ही काय डोळे झाकून बिग बॉस बघत नाही, नाहीतर ॲक्शन रिप्लेमध्ये आर्याची चापट दाखवा".
ADVERTISEMENT