Simran budharups viral Video : मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठमोठे सेलिब्रिटी,उद्योगपती, कलाकार,प्रसिद्ध खेळाडू येत असतात. या दरम्यान अनेकदा भाविकांच्या गर्दीमुळे धक्काबुक्कीच्या घटना घडत असतात. अशीच एक घटना आज प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सिमरन बुधरूपसोबत घडली आहे.सिमरन नुकतीच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेली होती, मात्र यादरम्यान तिच्यासोबत गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेवर आता मराठी अभिनेत्री शर्मिला राजाराम शिंदे प्रचंड संतापली आहे. (simran budharups dishearting experience at mumbai lalbaugacha raja marathi actor sharmila shinde reaction)
ADVERTISEMENT
'कुमकुम भाग्य' आणि 'पांड्या स्टोअर'ची अभिनेत्री सिमरन बुधरूपला हिला हा अनुभव आला होता. त्यानंतर नवरी मिळे हिटलरला फेम अभिनेत्री शर्मिला राजाराम शिंदे हिची पोस्ट बरीच चर्चेत आली. तसेच या सगळ्यावर शर्मिलाने अगदी सूचक वक्तव्यही केल्याचं पाहायला मिळालं आहे.
अभिनेत्रीच्या पोस्ट जशीच्या तशी...
शर्मिलाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, 'मी लहान होते तेव्हा आमची आई आम्हाला खूप कष्टाने मानाच्या गणपतींचं दर्शन घडवायची. गर्दीत चेंगरत चेंगरतच दर्शन घ्यायचो आम्ही सुद्धा… पण, आता मी एक कलाकार आहे. मला फार प्रेमाने आणि आदराने मंडळं आरतीसाठी आमंत्रित करतात म्हणून मी जाते. इतरांनी ज्या मंडळांमधे योग्य वागणूक दिली जात नाही तिथे जाणं टाळा. देव सर्वत्र आहे. घरी बसून नमस्कार करा. आपला माणुसकीचा कोटा (Quota) high ठेवा. आपल्या आई वडिलांची काळजी घ्या. त्यांची म्हातारपणी सेवा करा. माणसांसाठी आणि इतर प्राणिमात्रांसाठी मनात दया-माया असुद्या. दुसऱ्यांच्या लेकरांना स्वतःच्या लेकरांप्रमाणे प्रेमाने वागवा. बास! यापेक्षा मोठी भक्ती काय असेल. गणपती बाप्पा मोरया! PS : जी मंडळं भाविकांना नीट वागवतात तिथे भाविकांनी सुद्धा सहकार्य करावे.'
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : बहिणींच्या पैशावर भावाचा डल्ला, 12 पुरुषांनी महिलांचे फोटो लावून भरला अर्ज; कशी झाली पोलखोल?
नेमकं काय घडलं?
अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्यासोबत झालेल्या या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सिमरन ही मंडपातील पायऱ्या चढत असताना एक महिला बाऊन्सर तिला धक्काबुक्की करताना आणि ओरडताना दिसत आहे. यावेळी अभिनेत्री सिमरन देखील जोरात ओरडत आहे. सिमनर हिने याबाबत पोस्टमध्ये लिहिलं, 'मंडपात गणपती बाप्पाचे दर्शन घेणे हा एक वाईट अनुभव होता. मी माझ्या आईसोबत लालबागचा राजा येथे बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते, परंतु तेथील वागणूक वाईट होती. त्यापैकी एका कार्यकर्त्याने माझी आई फोटो काढत असताना तिचा फोन हिसकावून घेतला. मी दर्शन घेत असल्याने आई तिथेच थांबली होती आणि त्यामुळे ती फोटो काढत होती.'
'जेव्हा माझ्या आईने फोन परत घेण्याचा प्रयत्न केला त्याने त्याने तिने त्याला ढकलून दिले. मी मध्यस्थी करण्यासाठी आले तेव्हा बाऊन्सर्सनी माझ्याशीही गैरवर्तन केले. जेव्हा मी माझ्या मोबाइलवर त्यांचे वर्तन रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी माझा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ओरडताना दिसत आहे, हे करू नका, तुम्ही काय करत आहात? जेव्हा मी त्यांना सांगितले की मी अभिनेत्री आहे, तेव्हा त्यांनी माघार घेतली.'
हे ही वाचा : Lalbaugcha Raja: लालबागच्या राजासमोरून धक्के मारून बाहेर काढलेली 'ती' अभिनेत्री कोण?
या संपूर्ण घटनेबद्दल सिमरनने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे, सिमरन म्हणाली की, 'भक्त सकारात्मकतेने आणि आशीर्वाद घेण्याच्या इच्छेने आणि गैरवर्तनाची अपेक्षा न करता अशा पवित्र स्थळांना भेट देतात. त्यामुळे इव्हेंट संस्था आणि कार्यकर्त्यांनी भक्तांशी दयाळूपणे आणि सन्मानाने वागावे.' अशी विनंती केली आहे.
दरम्यान, सुरुवातील सिमरन ही एखादी सामान्य तरुणी आहे असं वाटल्याने मंडपातील बाउन्सर हे तिच्याशी अत्यंत उर्मटपणे वागत होते. आपण आपण अभिनेत्री आहोत असं जेव्हा सिमरनने सांगितलं तेव्हा तेथील कार्यकर्ते आणि बाउन्सर हे अचानक शांत झाले आणि त्यांनी माघार घेतली.
ADVERTISEMENT