Mahima Chaudhary Mother Passed Away : अभिनेता सतीश कौशिक यांच्या निधनानंतर आता बॉलिवुडवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महिमा चौधरीच्या (Mahima Chaudhary)आईचे निधन झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्या आजारी होत्या. या आजारपणातून त्याचं निधन झाल्याची माहिती आहे. (bollywood actress mahima chaudhary mother passed away)
ADVERTISEMENT
महिमा चौधरीची (Mahima Chaudhary)आई गेल्या अनेक वर्षापासून आजाराचा सामना करत होत्या. या आजारपणातून त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्टनुसार, महिमाच्या आईने या जगाचा निरोप घेतला आहे. महिमाच्या आईचे दोन-तीन दिवसांपुर्वी निधन झाल्याचे बोलले जातेय.आईच्या निधनानंतर महिमा चौधरी आणि तिची मुलगी अरियानावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हे ही वाचा : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे पुण्यात निधन
प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीच्या (Mahima Chaudhary) आयुष्यात याआधी देखील वादळ आले होते. महिमा चौधरीला कॅन्सर झाला होता. 9 जून 2022 ला प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेरने (Anupam Kher) या गोष्टीची माहिती दिली होती. सिग्नेचर सिनेमाच्या शुटींग दरम्यान महिमा चौधरीने ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती अनुपम खेरला दिली होती. या दरम्यान तिच्यावर उपचार सुरु होते. ज्या पद्धतीने ती स्वत:ला सांभाळतेय.सर्व गोष्टी करतेय. ती प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे. इतकंच नाही तर अनुपम खेर (Anupam Kher) तिचा एक व्हिडिओ देखील शेअर केला होता, ज्यामध्ये महिमा चौधरी इमोशनल होऊन तिच्या फॅन्सना ब्रेस्ट कॅन्सची माहिती देताना दिसली होती.
हे ही वाचा : मुंबई Tak बैठक: रितेश देशमुख राजकारणात प्रवेश करणार? खरं काय ते सांगूनच टाकलं!
द सिग्नेचरसाठी काम करायला सुरुवात केली होती, त्यावेळेस ती कॅन्सरबाबत बोलली होती. तसेच तिने खुलासा देखील केला होता की ती कॅन्सर फ्री झाली आहे. फॅन्सने हा व्हि़डिओ पुर्णपणे पाहिला नव्हता. त्यांनी फक्त मी उपचारासाठी अमेरीकेला गेले हेच पाहिले.पण वस्तुस्थिती अशी आहे की मी फक्त मुंबईत होते,असे नंतर महिमाने सांगितले होते.
महिमाने शाहरूख सोबत परदेस या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा तिचा पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटानंतर ती रातोरात स्टार झाली होती. या सिनेमातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
ADVERTISEMENT