दिव्यांग तरूणाला निघृणपणे संपवलं, मृतदेह जिप्सी कारमध्ये टाकून पसार झाले, मंचरमध्ये खळबळजनक घटना

Pune Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २८ एप्रिल) मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्याने गणेश सोनवणे याची हत्या केली. गणेश याची टपरी गॅरेजसमोर होती.

Mumbai Tak

मुंबई तक

29 Apr 2025 (अपडेटेड: 29 Apr 2025, 05:25 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धक्कादाय घटना

point

दिव्यांग तरूणाची निधृणपणे हत्या

point

हत्या केल्यानंतर तरूणाचा मृतदेह कारमध्ये टाकला

Pune Crime News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या हादरवून सोडणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक घटना घडली.  महात्मा गांधी विद्यालयासमोरील गॅरेजजवळ एका अपंग तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. गणेश सोनवणे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> धक्कादायक.. Family Man 3 च्या अभिनेत्यासोबत काय झालं? संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांकडून हत्येचा आरोप!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २८ एप्रिल) मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्याने गणेश सोनवणे याची हत्या केली. गणेश याची टपरी गॅरेजसमोर होती. हत्येनंतर आरोपीने त्याचा मृतदेह टपरीशेजारी उभ्या असलेल्या जिप्सी कारमध्ये टाकून घटनास्थळावरून पलायन केले. मंगळवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मंचर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

हे ही वाचा >> लेकानं स्वत:ला संपवलं, आईला पाहावलं नाही म्हणून तिनंही विष प्राशन केलं... बीड जिल्हा हळहळला, प्रकरण काय?

या प्रकरणात हत्येचे कारण आणि आरोपींची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास तीव्र करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना पकडावे, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, मंचर पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत असून, लवकरच आरोपींना अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.


    follow whatsapp