Beed News : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला या छोट्याशा गावात एक अत्यंत दुखद आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका तरुणाने स्वतःचे आयुष्य संपवल्याच्या धक्कादायक बातमीनंतर, त्याच्या आईनेही प्रचंड मानसिक आघातातून आत्महत्येचा मार्ग निवडला. या दुहेरी मृत्यूंमुळे गावात शोककळा पसरली असून, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात प्रश्नांचे काहूर माजले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> पुन्हा एक सासू जावयासोबत पळाली! लेकीचं लग्न मोडलं, दुसरीकडे ठरलं, मात्र त्याआधीच आई...
मुलाने फाशी घेतली, आईनं विष प्राशन केलं
अभिमान खेत्रे (वय 36) या तरुणाने काल, 28 एप्रिल रोजी दुपारी फाशी घेऊन आपले जीवन संपवले. ही सुन्न करणारी बातमी त्याच्या आई, कौशल्या भागुजी खेत्रे (वय 70) यांना कळताच त्या सुद्धा हादरल्या. आपल्या लाडक्या मुलाला गमावल्याचं दुःख त्यांना सहन झालं नाही. प्रचंड मानसिक तणावात त्यांनी काही वेळातच विषारी औषध प्राशन केले. अभिमानचा मृत्यू काल सायंकाळी 4 वाजता झाला, तर कौशल्याबाईंनी आज, 29 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता उपचारा दरम्यान अखेरचा श्वास घेतला.
एकाच कुटुंबातील दोघं गेल्यानं गावावर शोककळा
एका कुटुंबातील दोन व्यक्तींच्या या आत्महत्या गावासाठी मोठा धक्का ठरल्या आहेत. कौशल्याबाईंच्या डोळ्यांसमोर त्यांच्या मुलाचा मृत्यू आणि त्यानंतर त्यांनी स्वतः घेतलेला टोकाचा निर्णय, या घटनेने नातेवाईक, शेजारी आणि गावकऱ्यांना हादरवून सोडले आहे. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. “अभिमान आणि त्याच्या आईचा असा अंत होईल, असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते,” असे एका गावकऱ्याने डोळ्यात अश्रू साठवत सांगितले.
हे ही वाचा >> ज्यानं पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली, तोच निघाला खूनी; 3 महिन्यांनी 300 किमीदूर सापडला मृतदेह, प्रकरण काय?
आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असून, या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. मात्र, कारण काहीही असले, एका घरातील दोन जीव एकाच वेळी गमावल्यानं वाहेगाव आमला गावासह बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय.
ADVERTISEMENT
