Salman Khan Threat Message : 'सलमान'ला पुन्हा धमकी; वाहतूक पोलिसांना आलेल्या मेसेजमध्ये काय म्हटलंय?

मुंबई तक

18 Oct 2024 (अपडेटेड: 18 Oct 2024, 12:57 PM)

Salman Khan Threat Case : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे धक्क्यात बसलेल्या सलमान खानला पुन्हा एकदा धमकी आली आहे.

Salman Khan Threat Message

Salman Khan Threat Message

follow google news

बातम्या हायलाइट

point

अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

point

मुंबई वाहतूक पोलिसांकडे धमकीचा मेसेज

point

बिश्नोई गँगशी संबंधीत व्यक्ती असल्याचा दावा

Salman Khan Threat Case मुंबई : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे धक्क्यात बसलेल्या सलमान खानला पुन्हा एकदा धमकी आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांना आलेल्या एका मेसेजमध्ये थेट सलमानला इशारा देण्यात आला आहे. तसंच मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने आपण लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधीत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता अभिनेता सलमान खान आणि त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून आहेच, मात्र बाबा सिद्दीकींच्या हत्येमुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळालं आहे. (Mumbai traffic police gets message Lawrence Bishnoi gang threating to salman khan)

हे वाचलं का?

धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या या व्यक्तीने मेसेजमध्ये आपण लॉरेन्स बिश्नोईचा नीकटवर्तीय असल्याचं म्हटलं आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हाट्सअपवर हा धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये पुढे असंही म्हटलंय की, सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वैर असून, ते संपवायचं असेल तर आपण यामध्ये मध्यस्थी करू. यासाठी 5 कोटी रुपयांची मागणी देखील करण्यात आली आहे. तसंच  धमकी देणारा एवढ्यावरच थांबला नाही. त्याने असंही म्हटलंय की, हलक्यात घेऊ नका, नाहीतर 'सलमान खानचे हाल बाबा सिद्दींपेक्षा वाईट होतील.' या मेसेजनंतर मुंबई पोलिसांनी प्रकरणाचा शोध सुरू केला आहे. 

हे ही वाचा >>Baba Siddique : ''मला गोळी लागलीय, मी आता...'', छातीत गोळ्या घुसल्यानंतर सिद्दीकींचे अखेरचे शब्द

मुंबई पोलिसांनी यापूर्वी सलमान खानच्या हत्येचा कट रचण्याच्या आरोपात एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीला हरियाणातील पानीपतमधून अटक करण्यात आल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. तर अटक केलेल्या आरोपीचं नाव सुक्खा असं आहे. तर ही व्यक्ती बिश्नोई गँगसाठी काम करत असून, शार्प शूटर असल्याचं समजतंय. या आरोपीला नवी मुंबईमध्ये आणण्यात आलंय असं देखील समोर आलंय. 

दरम्यान, या प्रकरणात अशीही माहिती समोर येतेय की, मुंबई आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शार्प शूटरला पानीपतमधून अटक केली आहे. 
सुक्खानेच 2022 मध्ये सलमान खानच्या पनवेलमधील फार्म हाऊसची रेकी केली होती. रेकीनंतर तो सलमानवर हल्लाही करणार होता, मात्र त्याचा प्लॅन फेल झाला. त्यावेळी या शार्प शूटर्सनी फार्म हाऊसच्या गार्ड्ससोबत मैत्रीही केल्याचं समोर आलंय. 

हे ही वाचा >>Lawrence Bishnoi: दाऊदचाच पॅटर्न, बाबा सिद्दीकींची सुपारी घेणारा लॉरेन्स बिश्नोई 'B' कंपनीच्या तयारीत?

आधी फार्म हाऊसची रेकी, नंतर सलमान खानच्या घरावर गोळीबार आणि अलीकडेच झालेल्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे सलमान खान आणि त्याचं संपूर्ण कुटुंब भीतीच्या वातावरणात आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांच्या तपासात नेमकं काय काय समोर येतंय, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

    follow whatsapp