प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येने संपूर्ण चित्रपटविश्वाला मोठा धक्का बसला आहे. अनेकांना या गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे. दरम्यान चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाने आत्महत्या का केली? असा सवाल अनेकांना पडला आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमागे त्यांच्यावर आलेला कर्जबाजारीपणा आणि स्वत:च्या हातातून उभारलेला स्टूडिओ हातातून सुटण्याची भीती ही कारणे समोर येत आहेत. मात्र यामध्ये किती तथ्य आहे, ते जाणून घेऊय़ात.
ADVERTISEMENT
नितीन देसाई यांनी राज्यसरकारकडून कर्ज घेऊन महाऱाष्ट्रातील कर्जतमध्ये 50 एकर जागेवर स्टूडिओ उभारला होता. या स्टूडिओत हृतिक रोशनच्या जोधा अकबर सिनेमाची शुटींग करण्यात आली होती.त्यानंतर नितीन देसाई यांनी हा सेट तेथून न हटवताच त्याठिकाणी मालिका शुटींग करण्यास परवानगी दिली होती.
नितीन देसाईंनी सुरुवातीला 150 कोटींचे कर्ज घेतले होते. ईसीएल फायनान्सने हे लोन 2016ला मंजूर केले होते. त्यानंतर पुन्हा फेब्रुवारी 2018 मध्ये त्यांनी 35 कोटीचे लोन घेतले होते. मात्र नितीन देसाई यांच्यावर आधीच कर्ज असल्याने त्यांना 31 कोटीची रक्कम कर्ज म्हणून मंजूर झाली होती.. त्यामुळे असे मिळून त्यांच्यावर 180 कोटीचे कर्ज होते. जेव्हा त्यांनी हे कर्ज घेतलं त्यावेळीस त्यांनी स्टूडिओची जमीन आणि इतर काही संपत्ती तारण ठेवल्या होत्या. दरम्यान हे कर्ज फेडण्यास त्यांना अडचण येत होती. 2020 पासून म्हणजेच कोविड वैश्विक महामारीच्या सुरू होण्याच्या तीन महिन्यापूर्वीच त्यांना कर्ज फेडण्यात अडचणी येत होत्या.
हे ही वाचा : निसर्ग कवीची ‘एक्झिट’! ना. धों. महानोर यांचं निधन, शरद पवार झाले भावूक!
31 मार्च 2022 आणि 9 मे 2022 या कर्ज परतफेडीच्या अंतिम तारखा होत्या. मात्र या मुदत पाळता न आल्याने त्यांना कर्जबुडीत एनपीएस घोषित करण्यात आले होते. पुढे जून 2022 पर्यंत कर्जाची रक्कम 258.48 करोड पोहोचली होती. नितीन देसाई यांच्यावर कर्ज देणाऱ्या कंपनीने कारवाई करायला सुरुवात केली होती.
नितीन देसाई यांच्या दिवाळखोरी विरोधात दाखल केलेल्या दाव्यावर मुंबई खंडपीठाने कार्यवाहिचा आदेश २५ जुलै २०२३ रोजी निकाल आला होता. 8 दिवसापूर्वी आलेल्या या निकालात नितीन देसाई यांचा स्टूडिओ इतर मालमत्ता प्रशासकीय नियुक्त इतर मालकाकडे हस्तांतरीत करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे नितीन देसाई यांनी स्टूडिओ हातातून जाण्याची भीती होती. यातूनच नितीन देसाई यांनी आपल्या स्वत:च्या हातातून बनवलेल्या स्टूडिओत गळफास लावून आत्महत्या केली.
ADVERTISEMENT