कलाकार हा सर्वगुणसंपन्न असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याही शैलीचा अभिनय उत्तम करण्याची कला असते. त्यांच्यासाठी मुख्य ध्येय असतं ‘प्रेक्षकांचे मनोरंजन’. हेच ध्येय मनाशी पक्क करून, स्वतःकडून कायम कसं उत्तम सादरीकरण दिलं जाईल याकडे लक्ष देणारी अभिनेत्री जिने मराठी सिनेृष्टीत एंट्री घेतल्यावर अनेकांना तिच्या सौंदर्यावर, अभिनय कौशल्यावर प्रेम करायला भाग पाडले आणि ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री ‘मोनालिसा बागल’.मोनालिसा लवकरच अजून एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. झी टॉकीज प्रस्तुत टॉकीज ओरिजनल चित्रपट ‘गस्त’मध्ये मोनालिसा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
ADVERTISEMENT
तानाजी गलगुंडे आणि मोनालिसा बागल ही जोडी पहिल्यांदाच या निमित्ताने प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळेल. दोघेही कमालीचे कलाकार असल्यामुळे त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ही जबरदस्त असेल यात शंकाच नाही. सैराट सारख्या सुपरहिट चित्रपटातील लोकप्रिय कलाकार बाळ्या म्हणजेच अभिनेता तानाजी गालगुंडे याच्या सोबत काम करण्याची मोनालिसाची पहिलीच वेळ. बाळ्या प्रमाणेच गस्त मधील तानाजीची भूमिका आणि तानाजी व मोनालिसा यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री नक्कीच रंजक असेल.आपल्या भूमिकेबद्दल बोलताना मोनालिसा म्हणाली, “मी गस्त या चित्रपटात सुजाता नावाची व्यक्तिरेखा निभावतेय. ती खूपच चंचल मुलगी आहे. ती अमर नावाच्या मुलाच्या प्रेमात आहे आणि त्याला भेटण्यासाठी ती कुठल्याही बहाणा करताना मागे पुढे पाहत नाही. मी पहिल्यांदाच तानाजीसोबत काम केलं आणि त्यांच्या सारख्या उत्तम अभिनेत्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. ही एक अनोखी प्रेम कहाणी आहे आणि प्रेक्षकांना पाहताना खूप मजा येईल.”
ADVERTISEMENT