Shreyas Talpade Reaction On Death Rumours : अभिनेता श्रेयस तळपदेचं निधन झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत. व्हायरल झालेल्या या पोस्टमुळं तळपदे कुटुबीयांना मोठा धक्का बसला आहे. १५ डिसेंबर २०२३ ला श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर प्रकृती ठणठणीत असल्याचं श्रेयसने माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. परंतु, नुकत्याच व्हायरल झालेल्य निधनाच्या बातम्यांमुळे खुद्द श्रेयसला 'मी जिवंत आहे' अशी पोस्ट शेअर करावी लागली. माझं आरोग्य निरोगी आणि उत्तम असल्याचं श्रेयसने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
श्रेयस तळपदेची प्रकृती ठणठणीत
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये श्रेयसने लिहिलं, "मी जिवंत आहे. मी आनंदी आणि निरोगी आहे. माझं निधन झालं आहे, अशा पोस्ट व्हायरल झाल्याचं मला कळलं. मला माहित आहे, विनोदाची गोष्ट त्या जागेवर असते. परंतु, या गोष्टींचा गैरवापर झाल्यास नुकसानही होतं. कुणीतरी हे विनोद म्हणून सुरु केलं असेल, पण त्यामुळे अनावश्यक नैराश्य निर्माण होत आहे. माझ्या कुटुंबीयांच्या भावनांसोबत केलेला हा एकप्रकारचा खेळ केला आहे.
हे ही वाचा >>
माझी लहान मुलगी आहे. ती दररोज शाळेत जाते. माझ्या आरोग्याबाबत आधीपासूनच तिला चिंता वाटते. माझ्या आरोग्याबद्दल ती मला नेहमी विचारत असते. माझी तुम्हाला विनंती आहे, चुकीच्या बातम्यांमुळे तिची भीती वाढवू नका. ति तिच्या शाळेतील शिक्षिका आणि मित्रांना याबाबत विचारणा करत आहे. माझ्या निधनाची खोटी माहिती पसरवणाऱ्यांना माझी विनंती आहे, त्यांनी कृपया हे सर्व थांबवावं. माझ्या आरोग्याबाबत अनेकांनी विचारपूस केली आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला टार्गेट करून चुकीच्या पोस्ट शेअर करता, त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही. पण त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांवर त्याचा परिणाम होतो. विशेत: छोट्या मुलांवर प्रभाव पडतो. लहान मुलं या परिस्थितीला समजू शकत नाहीत. ते खूप भावनिक असतात."
हे ही वाचा >>
ट्रोलर्सला केली विनंती
माझ्या आरोग्याबाबत ज्यांनी विचारणा केली आहे, त्यांचा मी आभारी आहे. तुमचं प्रेम माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. ट्रोलर्सला माझी विनंती आहे, हे सर्व बंद करा. असा विनोदी प्रकार कुणासोबत करु नका. तुमच्यासोबत असं काही घडावं, अशी माझी इच्छा नाही. दुसऱ्यांचा भावनांचा खेळ करून लाईक्स आणि व्यूज वाढवणे चांगलं नाही.
ADVERTISEMENT