Maharashtra Assembly Election 2024 PM Modi: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra VidhanSabha Election 2024) साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (14 नोव्हेंबर) मुंबईत जाहीर सभेसाठी आले होते. मुंबईत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना एक जोरदार टोला लगावला. ज्यावरून आता नवं राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे. (maharashtra assembly election 2024 appreciate balasaheb thackeray from rahul gandhi mouth and you will never have to go to the hospital pm modi criticizes uddhav thackeray after coming to mumbai)
ADVERTISEMENT
'काँग्रेसच्या युवराजांच्या तोंडून बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करणाऱ्या गोष्टी वदवून घ्या. ज्या दिवशी तुम्ही एवढं करून घ्याल ना.. तुम्हाला खरोखरच चांगली झोप येईल, कधी हॉस्पिटलला जावं लागणार नाही. बाळासाहेबांचे आशीर्वाद मिळतील.' असं विधान पंतप्रधान मोदी यांनी शिवाजी पार्कवरील भाषणात केलं आहे.
हे ही वाचा>> Lokpoll Survey: महायुती सरकारला धोका? मविआला किती जागा मिळणार? लोकपोलच्या सर्व्हेनं उडवली खळबळ
पाहा मुंबईतील सभेत पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?
'मुंबई तर बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताचं शहर आहे. मुंबई स्वाभिमानाचं शहर आहे. पण आघाडीत एक असा पक्ष आहे की, ज्यांनी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला आहे. त्यासाठी मी यांना आव्हान दिलं होतं की, काँग्रेसच्या युवराजांच्या तोंडून बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करणाऱ्या गोष्टी वदवून घ्या.'
'अरे एकदा तरी काँग्रेसच्या युवराजाच्या तोंडून वदवून घ्या.. की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे... ज्या दिवशी तुम्ही एवढं करून घ्याल ना.. तुम्हाला खरोखरच चांगली झोप येईल, कधी हॉस्पिटलला जावं लागणार नाही. बाळासाहेबांचे आशीर्वाद मिळतील.'
हे ही वाचा>> PM Narendra Modi: "मुंबई बाळासाहेब ठाकरेंच्या...", शिवाजी पार्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी 'हे' काय बोलून गेले
'आजवर ही लोकं काँग्रेस किंवा काँग्रेसच्या लोकांकडून बाळासाहेबांची प्रशंसा करवून घेऊ शकलेले नाहीत. हेच आघाडीवाल्यांचं सत्य आहे. वीर सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना देखील हे गळाभेट देत आहेत.' असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे.
आता पंतप्रधान मोदींच्या या टीकेला उद्धव ठाकरे आणि शिवसेना (UBT) कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT