Narendra Modi: खुशखबर! PM नरेंद्र मोदींनी महिलांसाठी केली 'या' मोठ्या योजनेची घोषणा

मुंबई तक

14 Nov 2024 (अपडेटेड: 14 Nov 2024, 05:56 PM)

Narendra Modi Speech : आता आम्ही तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याच्या योजनेवर काम करत आहेत. दरवर्षी त्या महिलेचं वार्षिक उत्पन्न एक लाखांहून जास्त व्हावं, अशी व्यवस्था असणार आहे.

Narendra Modi Speech,

Narendra Modi Speech,

follow google news

बातम्या हायलाइट

point

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या योजनेबाबत काय म्हणाले?

point

मोदींनी काँग्रेसवर केला हल्लाबोल

point

पनवेलच्या सभेत नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

Narendra Modi Speech : "आता आम्ही तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याच्या योजनेवर काम करत आहेत. दरवर्षी त्या महिलेचं वार्षिक उत्पन्न एक लाखांहून जास्त व्हावं, अशी व्यवस्था असणार आहे. तीन कोटी लखपती दीदी बनवण्याचं माझं स्वप्न आहे. ड्रोनसारख्या नवीन टेक्नोलॉजीची आज आपल्या देशात चर्चा आहे. याचा लाभही महिलांना मिळाला पाहिजे. यासाठी ड्रोन दिदी योजनेचं काम सुरु आहे", असं मोठं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते पनवेलमध्ये महायुतीच्या सभेत बोलत होते. 

हे वाचलं का?

जनतेला संबोधीत करताना मोदी पुढे म्हणाले, "महाराष्ट्रात महायुती सरकार महिलांना डबल लाभ देत आहे. महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजना याचं उदाहरण आहे. यामुळे तुमच्या खर्चासाठी तुम्हाला मदत मिळते. तुमच्या कामांना पुढे नेण्यासाठी मदत करते. पण काँग्रेस आणि आघाडीवाले महिलांसाठी या योजना बनवल्या आहेत, त्याचाही विरोध करत आहेत. यांचे लोक या योजनेला रोखण्यासाठी कोर्टापर्यंत गेले होते. आघाडी पक्षांची नियत किती खराब आहे, तुम्ही याचा विचार करा. आघाडीला संधी मिळू नये, हे महाराष्ट्रातीस महिलांनी ठरवलं आहे.

हे ही वाचा >>  Lokpoll Survey: महायुती सरकारला धोका? मविआला किती जागा मिळणार? लोकपोलच्या सर्व्हेनं उडवली खळबळ

मला विश्वास आहे, जेव्हा महिला ठरवतात. देशाने आता काँग्रेसचं सत्य ओळखलं आहे. काँग्रेस सत्ता मिळवण्यासाठी काहीही करेल, यासाठी काँग्रेस पक्ष समजात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. यांना सर्वात जास्त धोका, एससी, एसटी, ओबीसींच्या ताकदीचा आहे. जातीत जातीत टक्कर व्हावी आणि ओबीसी, एससी, एसटी कमकुवत व्हावे, अशी काँग्रेसची इच्छा आहे. काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांना बळी पडला, तर काँग्रेस सर्व समाज घटकांना तोडून सत्ता स्थापन करण्याची संधी मिळवेल".

हे ही वाचा >> Ajit Pawar: "मुस्लिमांच्या भावना दुखावणार...", 'बटेंगे तो कटेंगे'वरून अजित पवार नेमकं काय म्हणाले?

यांना संधी मिळाली तर ते आरक्षणालाही संपवून टाकतील. यासाठी आज काँग्रेस एससी, एसटी, ओबीसीच्या एकतेला तोडत आहे. एसटी, एससी, ओबीसींच्या जातीत एकमेकांमध्ये वाद व्हावे, असं काँग्रेसला वाटतं. प्रत्येक समाजात जातीचं द्वेष पसरवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. आम्ही एक आहोत तर सेफ आहोत, असं मोठं विधान मोदींनी यावेळी केली, असंही मोदी म्हणाले. 

    follow whatsapp