Govt Job : दिवाळीआधीच चमकणार नशीब! कोकण रेल्वेत मेगा भरती, आजच करा अर्ज! 

मुंबई तक

23 Oct 2024 (अपडेटेड: 23 Oct 2024, 04:49 PM)

Kokan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेत सध्या अप्रेंटिसशिपची संधी आहे. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक या चार विषयात पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिससाठी संधी आहे

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

कोकण रेल्वेत अप्रेंटिसशिपची संधी

point

नोकरीचे ठिकाण कोकण रेल्वे आहे.

point

शैक्षणिक पात्रता काय?

Kokan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेत सध्या अप्रेंटिसशिपची संधी आहे. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक या चार विषयात पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिससाठी संधी आहे. तर, जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट या विषयात सामान्य पदवीधर अप्रेंटिससाठी संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, या एकूण 190 जागांसाठी 02 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण कोकण रेल्वे आहे. (apprenticeship recruitment 2024 in kokan railway golden opportunity apply now)

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • पदवीधर अप्रेंटिस: संबंधित इंजिनिअरिंग पदवी
  • डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • सामान्य पदवीधर अप्रेंटिस: BA/B.Sc/B.Com/BBA/BSMS/BJMC/BBS असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Ajit Pawar Candidates List : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत कोणत्या लाडक्या बहिणींना संधी?

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 100 रूपये शुल्क आकारले जात आहे.
  • तर, एससी/एसटी/ ईडब्ल्यूएस/ अल्पसंख्याक/ महिला कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही आहे.

अधिक माहितीसाठी कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://konkanrailway.com/ वरून माहिती मिळवू शकता.

हेही वाचा : Ajit Pawar Candidates List : अजितदादांनी 38 जणांची नावं केली जाहीर, पण कोणत्या विश्वासू आमदारांना दिली संधी?

अर्जाची लिंक

https://wps.konkanrailway.com/nats/portal

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1D6kpRVJ3uxdoRaevV9LD_H9zXf5C94gW/view?usp=sharing

    follow whatsapp