Ladki Bahin Yojana : 2 कोटी 49 लाख होणार खर्च, पण नेमके कुठे?

मुंबई तक

22 Oct 2024 (अपडेटेड: 22 Oct 2024, 02:41 PM)

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme: राज्यात जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेची सूरूवात करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा करण्यात आले होते. त्यानुसार आता नोव्हेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात 7500 रूपये जमा झाले आहेत.

ladki bahin yojana news  government orgnize exhibition mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare

महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे 7500 रूपये जमा झाले आहेत.

follow google news

बातम्या हायलाइट

point

सरकार 2 कोटी 49 लाख रूपये खर्च करणार

point

हा निधी महिलांच्या खात्यात जमा होणार का?

point

सरकार इतका पैेसा कुठे खर्च करणार?

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे 7500 रूपये जमा झाले आहेत. आता या महिलांना डिसेंबरमध्ये येणाऱ्या हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. अशात आता सरकार 2 कोटी 49 लाख रूपये खर्च करणार आहे. त्यामुळे नेमके हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत? की इतर कोणत्या गोष्टीसाठी सरकार है पैसे खर्च करणार आहे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana news  government orgnize exhibition mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare) 

हे वाचलं का?

राज्यात जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेची सूरूवात करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा करण्यात आले होते. त्यानुसार आता नोव्हेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात 7500 रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींनी या योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणींना 1500 नाही 2000 रू. देणार', CM शिंदेंचं मोठं विधान!

महिलांच्या खात्यात आता डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे. हा हप्ता डिसेंबर महिन्यातच महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. अशात आता सरकार 2 कोटी 49 लाख रूपये खर्च करणार आहे. मुळात हा खर्च महिलांना योजनेचा हप्ता देण्यासाठी करण्यात येणार आहे का? असा सवाल अनेक महिलांना पडला होता. मात्र तसे अजिबात नाही आहे. सरकार इतका खर्च हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रदर्शनीसाठी करणार आहे.15 ऑक्टोबर 2024 ला हा जीआर काढण्यात आला होता. 

जीआरमध्ये काय? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व अन्य विविध  योजनाबाबत माहितीचे संकलन, संशोधन, लेखन, संकल्पना, मांडणी आणि चित्रांसह डिझाईनसहित, चित्रांच्या कॅनवान्सेस तयार करून प्रदर्शनी लावण्याबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या खालीलप्रमाणे माध्यम आराखड्यास व त्याकरिता होणाऱ्या 2 कोटी 49 लाख,80 हजार 600 इतक्या खर्चास कार्योतर शासन मान्यता देत आहे. आराखड्यानुसार प्रदर्शनाची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महिला व बाल विकास विभागाच्या यंत्रणेच्या समन्वयाने करावी. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महिला व बाल विकास विभागाच्या यंत्रणेच्या समन्वयाने करावी. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सदर प्रदर्शन प्रसिद्धीची कार्यबाही प्रचलित नियमानुसाक व विहिक कार्यपद्धतीचा अवलंब करून करावी. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार?

डिसेंबरचा हप्ता महिलांना मिळणार 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. तसेच सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे. 
 

    follow whatsapp