Relatioship Tips: चुकूनही बायकोला 'या' तीन गोष्टी सांगू नका, नाहीतर उद्ध्वस्त होईल संसार

मुंबई तक

21 Oct 2024 (अपडेटेड: 21 Oct 2024, 08:02 PM)

Relatioship Tips News : अस म्हटलं जातं की नवरा बायकोने कोणत्याही गोष्टी एकमेकांपासून लपवल्या नाही पाहिजेत. कारण नवीन नवीन नातं असतं. या नात्यात सुरूवातीलाच जर लपवा छपवी झाली तर नात्यात भांडणे आणि दुरावा येतो. पण असे जरी असले तरी नातं चांगल टीकून रहाव यासाठी काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या असतात.

relationship tips do not say these 3 things to your wife even by mistake it will end your relation

नवरा बायकोने कोणत्याही गोष्टी एकमेकांपासून लपवल्या नाही पाहिजेत.

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवरा बायकोने कोणत्याही गोष्टी एकमेकांपासून लपवल्या नाही पाहिजेत.

point

पण या गोष्टीने बायकोला सांगणे टाळले पाहिजे

point

नाहीतर नातं तुटलं समजा

Relatioship Tips News : अस म्हटलं जातं की नवरा बायकोने कोणत्याही गोष्टी एकमेकांपासून लपवल्या नाही पाहिजेत. कारण नवीन नवीन नातं असतं. या नात्यात सुरूवातीलाच जर लपवा छपवी झाली तर नात्यात भांडणे आणि दुरावा येतो. पण असे जरी असले तरी नातं चांगल टीकून रहाव यासाठी काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या असतात. कारण या गोष्टी सांगून नवरा-बायकोच्या नात्यात अडचण देखील येते. त्यामुळे नेमक्या कोणत्या गोष्टी सांगणे टाळले पाहिजे. हे जाणून घेऊयात. (relationship tips do not say these 3 things to your wife even by mistake it will end your relation)

हे वाचलं का?

नवरा-बायकोमध्ये मतभेद किंवा भांडण होणे स्वाभाविक आहे, परंतु नवऱ्याने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की रागात किंवा मस्करी करतानाही तोंडातून असे शब्द काढू नयेत ज्यामुळे हे नात्यात दुरावा येईल. ज्या स्त्रीने आपले घर आणि सर्व नातेसंबंध सोडले आहेत, तिचा नवरा हाच तिचा आदर असतो, अशा परिस्थितीत नवऱ्याने कधीही रागात किंवा चेष्टेमध्ये असे शब्द उच्चारू नयेत, ज्यामुळे बायकोचं मन दुखावल जाईल. यामुळे अनेकदा मोठे वाद होतात आणि अनेक प्रकरणांमध्ये नाते तुटण्याच्या मार्गावर येतात. त्यामुळे येथे आम्ही तुम्हाला अशा 3 गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या नवऱ्याने कधीच बायकोला सांगू नयेत. 

हे ही वाचा : Optical Illusion Test : बाईईई...हा काय प्रकार! जंगलात हरवलेल्या बाईला 10 सेकंदात शोधून दाखवा

बायकोच्या लुक्सची चेष्टा करू नका 

नवऱ्याने कधीही आपल्या बायकोच्या शरीरावरून किंवा लुक्सवरून कधीच चेष्टा मस्करी करू नये. कारण ते बायकोसाठी खूप हृदयद्रावक आणि लाजिरवाणे असू शकते. तसेच बायकोची लठ्ठ, बारीक किंवा तिच्या उंचीबद्दल विनोदाने टिप्पणी करणे हे बॉडी शेमिंग आहे जे कोणत्याही स्त्रीला आवडणार नाही, हे लक्षात असू द्या. 

तुमचीही छोटीशी चेष्ठा किंवा टिपण्णी तुमच्या पत्नीचा स्वाभिमान दुखावू शकते. जेव्हा तुम्ही तिच्या शरीराच्या संरचनेवर टिप्पणी करता तेव्हा पत्नीमध्ये आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होते आणि ती तुमच्यापासून दूर राहते. त्यामुळे अशा गोष्टी तुमच्या पत्नीला चुकूनही बोलू नका.

नातेवाईकांच्या नावाने टोमणे मारू नका 

चुकूनही तुमच्या पत्नीची तिच्या कुटुंबाशी किंवा नातेवाईकांशी नकारात्मक तुलना करू नका. असे अनेकदा घडते जेव्हा पती आपल्या पत्नीची त्यांच्या नातेवाईकांशी तुलना करून आणि ती अगदी त्यांच्यासारखीच आहे असे सांगून त्यांना टोमणे मारतात. ही नकारात्मक तुलना पती-पत्नीच्या नात्यात दुरावा आणि नाराजी निर्माण करू शकते. जर तुमच्या पत्नीच्या कुटुंबात अशी एखादी व्यक्ती असेल ज्याची वृत्ती तुम्हाला योग्य वाटत नाही, तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही ती गोष्ट तुमच्या पत्नीवर शस्त्राप्रमाणे वापरावी. कारण हे शस्त्र तुमच्या पत्नीच्या मनावर खूप आघात करेल आणि याचा परिणाम तुमच्या नात्यावर होईल. 

हे ही वाचा : आई-बापाचं भांडण अन् पोराचा गेला जीव, बिबट्याने…

बायकोची आईशी तूलना 

जवळजवळ प्रत्येक पूरूष कळत नकळत आपल्या बायकोची तुलना आईशी करत असतो. परंतू ही वारंवार झालेली तुलना बायकोला आवडत नाही.  आईच्या हातचे खाणे, घर चालवणे, मुलांचे संगोपन करणे किंवा आदरातिथ्य करणे या प्रत्येक वळणावर महिलांना त्यांच्या पतीकडून त्यांच्या आईची तुलना ऐकायला मिळते, परंतु कोणत्याही पत्नीला हे आवडत नाही. तुमच्या आईचे व्यक्तिमत्व, परिस्थिती आणि सवयी आणि तुमच्या पत्नीचे व्यक्तिमत्व, परिस्थिती आणि सवयी वेगवेगळ्या असतात, त्यामुळे तुम्ही दोन भिन्न व्यक्तींची एकमेकांशी तुलना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

    follow whatsapp