Ladki Bahin Yojana : महिलांनो, नोव्हेंबरपर्यंतचे 7500 आले,आता डिसेंबरचे 1500 कधी मिळणार?

मुंबई तक

22 Oct 2024 (अपडेटेड: 22 Oct 2024, 06:20 PM)

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे 7500 महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यात निवडणुका लागू होणार असल्याने सरकारने नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोंबरमध्येच महिलांच्या खात्यात जमा केला होता.

 ladki bahin yojana scheme when will women get 1500 rupees aditi tatkare mukhymantri ladki bahin yojana scheme

डिसेंबरचे 1500 कधी मिळणार?

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जमा

point

डिसेंबरचे पैसे खात्यात कधी येणार

point

आदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे 7500 महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यात निवडणुका लागू होणार असल्याने सरकारने नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोंबरमध्येच महिलांच्या खात्यात जमा केला होता. त्यामुळे आता महिलांना डिसेंबरमध्ये खात्यात येणाऱ्या 1500 रूपयाची प्रतिक्षा लागली आहे. आता हे पैसे महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme when will women get 1500 rupees aditi tatkare mukhymantri ladki bahin yojana scheme) 

हे वाचलं का?

विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल,असा दावा विरोधकांकडून सतत केला जात आहे. या दाव्यानंतर  महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 2 कोटी 49 लाख होणार खर्च, पण नेमके कुठे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे.

डिसेंबरचे पैसे कधी येणार? 

महिलांच्या खात्यात नोव्हेबरपर्यंत म्हणजेच पाच महिन्याचे 7500 रूपये खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे आता महिलांना डिसेंबरमध्ये खात्यात येणाऱ्या 1500 रूपयांची उत्सुकता लागली आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचसोबत या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे. 

योजनेच्या निधीला ब्रेक मिळणार आहे का? 

लाडकी बहीण योजनेच्या निधीला ब्रेक लागणार असल्याच्या वृत्तानंतर इंडिया टुडेने महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांच्याशी बातचित केली होती.यामध्ये किरण कुलकर्णी यांनी ही लाडकी बहीण योजना कायम (सूरू राहील) राहणार आहे, अशी माहिती दिली. पण मॉडेल कोड ऑफ कडंक्टनुसार (MCC) कोणत्यागही नवीन लाभार्थी या योजनेत जोडला जाऊ शकत नाही. आणि जर महिला बालविकास विभागाला महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतर करायचे असतील तर त्यांना निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार?

मॉडेल कोड ऑफ कडंक्टच्या (MCC)सामान्य सूचनांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की,  MCC कालावधी दरम्यान कोणतीही नवीन योजना किंवा विद्यमान योजनांसाठी नवीन लाभार्थी जोडण्याची परवानगी नाही. निवडणूक आयोगाच्या पूर्वपरवानगीशिवाय निधी वितरित केला जाऊ शकत नाही. राज्य सरकार एमसीसीच्या सूचनांचे पालन करत आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. 

    follow whatsapp