Optical Illusion Test: फोटोत हत्ती दिसतोय? पण तो हत्ती नाही, क्लिक करून नीट बघा

मुंबई तक

31 Oct 2024 (अपडेटेड: 31 Oct 2024, 03:54 PM)

Elephant Optical Illusion Test: दिवाळी उत्सवाचा धमाका सुरु झाला असतानाच ऑप्टिकल इल्यूजनच्या एका व्हायरल फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Optical Illusion Elephant Photo

Animals Optical Illusion Photo

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऐन दिवाळीत ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोनं घातलाय धुमाकूळ

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या व्हायरल फोटोत कोणते प्राणी दिसले?

point

...तरच तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये व्हाल यशस्वी

Elephant Optical Illusion Test: दिवाळी उत्सवाचा धमाका सुरु झाला असतानाच ऑप्टिकल इल्यूजनच्या एका व्हायरल फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. रोजच्या धावपळीमुळे थकलेल्या लोकांना सक्रीय करण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक प्रकारचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होतात. परंतु, एका हत्तीच्या फोटोनं अनेक लोक चक्रावून गेले आहेत. कारण फोटोत हत्ती दिसतोय,असं अनेकांचं म्हणणं आहे, पण ते खरं नाही. हत्तीसारखा दिसणाऱ्या या फोटोत नेमकं दडलंय तरी काय? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला तल्लख बुद्धीचा वापर करावा लागेल. 

हे वाचलं का?

हत्तीसारखा दिसणाऱ्या या फोटोत 14 प्राणी लपले आहेत. फोटोत नेमके कोणते प्राणी आहेत, हे शोधण्यासाठी तुम्हाला 20 सेकंदाची वेळ दिलीय. ज्यांच्याकडे तीक्ष्ण नजर असेल, अशीच माणसं या फोटोत लपलेले चौदा प्राणी शोधू शकतात. पण ज्यांनी या फोटोत फक्त हत्तीलाच पाहिलं, असा लोकांना या फोटोतील गुपित समजणार नाही. म्हणजेच फोटोत असलेले हे प्राणी शोधण्यासाठी तुम्हाला बुद्धीचा कस लावावा लागणार आहे. 

हे ही वाचा >> Rule Change: ट्रेन तिकीट, क्रेडिट कार्ड अन् LPG...खिशाला लागणार कात्री! उद्यापासून बदलणार 'हे' 6 नियम

ज्या लोकांना या फोटोत असलेले प्राणी शोधण्यात यश आलं आहे, त्यांच्याकडे गरुडासारखी नजर आहे, असं म्हटलं तर ते योग्य ठरेल. कारण फोटोतील सर्व प्राणी 20 सेकंदात शोधणे वाटतं तितकं सोपं नाही. ज्यांना या फोटोत लपलेले प्राणी दिसले नाहीत, त्यांना अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, या हत्तीच्या फोटोत नेमके कोणते प्राणी लपले आहेत, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या फोटोत साप, कोळी (स्पायडर), रॅकून, कासव, सील, ससा, अस्वल, बिबट्या, कांगारू, माकड, सेलफीश, खारूताई, वटवाघूळ आणि शेवटी हत्तीला पाहू शकता. 

हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद? 'या' बड्या नेत्यानं दिली सर्वात मोठी अपडेट

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंना तीक्ष्ण नजरेनं पाहिलं, तर तुम्हाला यात लपलेल्या महत्त्वाच्या गोष्टी सहज पाहता येतील. त्यासाठी तुम्हाला तल्लख बुद्धीचा योग्य प्रकारे वापर करावा लागेल. फोटो पाहताना नीट लक्ष देऊन बघा. जेणेकरून तुम्हाला त्यातील बारकावे लक्षात येतील आणि या टेस्टमध्ये यश मिळवण्यात तुमचा मार्ग सुकर होईल. 

    follow whatsapp