Bhimrao Ambedkar Birth Anniversary: अंधारात खितपत पडलेल्या दीनांना दैदिप्यमान मार्ग दाखवणाऱ्या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील महू या गावात झाला. त्यांनी समाजातील जातीवादामुळे निर्माण झालेल्या भेदभाव आणि असमानतेविरुद्ध लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना आणि शिक्षण तसेच सामान्य अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्ष केला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> 64 विषयांमध्ये मास्टर, अनेक रेकॉर्ड्स, स्वत:चं ग्रंथालय... बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या 22 गोष्टी नक्की जाणून घ्या
आजही डॉ. बाबासाहेब यांचे कार्याचं स्मरण करुन त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेकांचे मार्गदर्शक आणि प्रेरणस्त्रोत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गुरुंविषयी तुम्हाला माहित आहे का? ते कोणाला आपले गुरु मानत असत? याविषयी आंबेडकरांनी त्यांच्या 'मूकनायक' या पुस्तकात सांगितलं आहे. या त्यांच्या आत्मकथेत आंबेडकरांनी त्यांचे प्रेरणास्त्रोत कोण होते? याविषयी स्पष्ट केले आहे. त्यांना ते गुरु मानत असत, असा उल्लेख त्यांनी केला आहे. गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांसारख्या समाजसुधारकांच्या जीवनप्रवासाचा आंबेडकरांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला.
पुस्तकात आंबेडकरांनी नेमकं काय सांगितलंय?
आंबेडकरांचे व्यक्तीमत्त्व घडवण्यासाठी त्यांनी मानलेले तीन गुरु कारणीभूत असल्याचे आंबेडकरांनी पुस्तकात सांगितलं आहे. 'आपल्याला हव्या त्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी जन्मजात काही गुण असावे लागतात, असं अजिबात नाही. खरंतर, आयुष्याच्या प्रवासात आपले प्रेरणास्त्रोत असलेल्या लोकांकडून त्यांचे गुण आपण आत्मसात करायला हवेत.' असं ते म्हणाले आहेत.
पहिले गुरु: गौतम बुद्ध
आंबेडकरांनी तीन समाजसुधारकांना त्यांचे गुरु मानले आहेत. गुरुंमुळेच त्यांच्या जीवनात क्रांती घडल्याचे आंबेडकरांनी सांगितले. दादा केलुस्कर हे आंबेडकरांच्या वडिलांचे मित्र होते. त्यांनी गौतम बुद्धांचे चरित्र लिहिले होते. एका संभारंभात केलुस्कर गुरुजींनी आंबेडकरांना 'बुद्धचरित्र' भेट म्हणून दिले होते. ते पुस्तक वाचल्यामुळे त्यांना वेगळाच अनुभव आल्याचे, त्यांनी सांगितले. बौद्ध धर्मात उच्च किंवा नीच यांना स्थान नाही. त्यांच्या मते, बौद्ध धर्मासारखा दुसरा कोणताच धर्म नाही. यामुळे आंबेडकर बौद्ध धर्माचे अनुयायी झाले.
हे ही वाचा: गुंड घायवळला नडणाऱ्या पैलवानाची क्राईम हिस्ट्री, समोर आलेल्या दुसऱ्या व्हिडीओत काय?
दुसरे गुरु: संत कबीर
आंबेडकरांचे दुसरे गुरु संत कबीर असल्याचे त्यांनी सांगितले. ते खऱ्या अर्थाने महात्मा होते, असे आंबेडकरांचे मत आहे. संत कबीर यांनी भेदभावाला कधीच स्थान दिलं नाही. संत कबीरांची शिक्षेचं पालन करत असल्याचं आंबेडकरांनी त्यांच्या आत्मकथेत सांगितलं आहे.
तिसरे गुरु: महात्मा फुले
हे ही वाचा >> पैसा-पाणी: बॉन्ड बाजाराच्या दबावामुळे माघार, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणून घेतला यू-टर्न?
महात्मा ज्योतिबा फुलेंना आंबेडकर त्यांचे गुरु मानत होते. त्यांच्या जीवनात त्यांना महात्मा फुलेंचं मार्गदर्शन मिळालं. कारण, महात्मा फुलेंच्या अथक प्रयत्नांनंतर या देशात मुलींसाठी पहिले विद्यालय उभे राहिले. आंबेडकरांच्या जीवन प्रवासाला त्यांनी या तीन गुरुंकडून आकार मिळाला, असे त्यांनी सांगितलं आहे.
हे ही वाचा: घरात ठेवलेली एक छोटी लवंग बदलेल तुमचं नशीब! आहेत प्रचंड चमत्कारिक फायदे
आंबेडकरांच्या मते विद्येचे महत्त्व
विद्या ही प्रथम पूज्य देवी असल्याचं आंबेडकांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. कारण त्यांच्या मते, ज्ञानाशिवाय काहीच शक्य नाही. या देशात बरेच लोक निरक्षर आहेत. आंबेडकरांच्या मते, ब्राह्मणांनी बुद्धांना शुद्र म्हटले होते, परंतु बौद्ध धर्मात कोणतीही जात नाही आणि शिक्षण घेण्यावर कोणावरच बंदी नाही. माणसाला अन्नाप्रमाणे ज्ञानाची आवश्यकता असते. त्यामुळे 'विद्या हीच माझी प्रथम पूज्य देवी आहे', असा त्यांनी आपल्या पुस्तकात उल्लेख केला आहे.
ADVERTISEMENT
