Mazi Ladki Bahin Yojana: गुड न्यूज… नोव्हेंबरमध्ये ‘या’ तारखेला मिळणार १५०० रुपये

मुंबई तक

• 08:16 PM • 02 Nov 2024

Ladki Bahin Yojana Latest News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे 7500 रूपये जमा झाले आहेत.

लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी केली मोठी घोषणा

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेबाबत केली मोठी घोषणा

point

शिंदेंनी लाडक्या बहिणींना दिली खुशखबर

point

मुख्यमंत्री शिंदे एनएनआयच्या मुलाखतीत नेमकं काय म्हणाले?

Ladki Bahin Yojana Latest News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. परंतु, ही योजना सुरु झाल्यापासून विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. निवणडुकीत मतदानाचा स्वार्थ बघून ही योजना सुरु केल्याचा आरोप विरोधक सत्ताधाऱ्यांवर करत आहेत. लोकसभेला महायुतीला अपयश मिळालं, म्हणून सरकारने ही योजना सुरु केली, असं विरोधकांचं म्हणणं आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनआयला दिलेल्या मुलाखतीत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

शिंदे एएनआयशी मुलाखत देताना म्हणाले, "लाडकी बहीण योजना इतक्या मोठ्या प्रमाणात चालवली जाऊ शकते, असं विरोधकांना वाटलं नव्हतं. त्यामुळे विरोधकांसाठी ते अनपेक्षित होतं. “लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकू नये यासाठी महिलांना नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले. 20 नोव्हेंबरला निवडणुकीचं मतदान आहे. तर निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे महिलांना डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच देण्यात येणार आहेत, असं मोठं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं.असं मोठं विधान शिंदेंनी केलं.

हे ही वाचा >> Shahrukh Khan Birthday: सर्वात आश्चर्यकारक Video आला समोर, किंग खानच्या 'मन्नत' बंगल्यासमोर घडलंय तरी काय?

लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. महिलांकडून या योजनेचं मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं जातंय. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत शिंदे म्हणाले, लाडक्या बहि‍णींसाठी आम्ही तत्पर आहोत. या योजनेच्या विरोधात काँग्रेससह महाविकास आघाडीचे लोक न्यायालयात गेले. पण आम्ही आमच्या लाडक्या बहि‍णींसाठी फक्त 1500 रुपयांपर्यंत नाही तर, त्यामध्ये वाढ करू आणि आमच्या बहि‍णींना लखपती करू. 

हे ही वाचा >> Optical Illusion: बागेत लपलाय 'फुल'पाखरू! किती जणांना दिसला? क्लिक करून सांगा पाहू

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत शिंदे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले, केंद्राने एक रुपया दिला तर शेवटी लोकांना 15 पैसे मिळतात. मात्र आता मोदींनी 1 रुपया दिल्यावर एकच रुपया मिळतो. आम्ही सर्व गाईडलाईन्स फॉलो करुन या योजनेची अंमलबजावणी करत आहोत. कोणीही मायेचा लाल आला तरी या योजनेला बंद करु शकत नाही. या योजनेमुळे विरोधक हादरले आहेत. ते म्हणतात, योजना बंद करु आणि आम्हाला तुरूंगात टाकू, पण अशा विरोधकांना लाडक्या बहिणी या निवडणुकीत घरी बसवतील.

    follow whatsapp