Diwali 2024 : यंदा दिवाळी 4 दिवस, कधी आहे लक्ष्मीपूजन, भाऊबीज? जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त

मुंबई तक

23 Oct 2024 (अपडेटेड: 23 Oct 2024, 10:10 PM)

Diwali 2024 Date, Laxmipujan Bhoubeej : यंदा दिवाळी ही 4 दिवस असणार आहे. पण तारखेवरून मोठा घोळ आहे. काहींना वाटतंय 31 ऑक्टोंबरपासून तर काहींना वाटतंय 1 नोव्हेंबर पासून दिवाळी सूरू होणार आहे. पण आम्ही तुम्हाला आज अचूक तारीख सांगणार आहोत. नेमकी दिवाळीच्या सुरूवात कधी पासून होणार आहे.

diwali 2024 laxmi pujan and bhaubeej date muhurt read full details

कधी आहे लक्ष्मीपूजन, भाऊबीज?

follow google news

बातम्या हायलाइट

point

यंदा दिवाळी ही 4 दिवस असणार आहे.

point

यंदाच्या वर्षी वसूबारस हे 28 ऑक्टोबरला

point

लक्ष्मीपूजन, भाऊबीज किती तारखेला?

Diwali 2024 Date, Laxmipujan Bhoubeej : यंदा दिवाळी ही 4 दिवस असणार आहे. पण तारखेवरून मोठा घोळ आहे. काहींना वाटतंय 31 ऑक्टोंबरपासून तर काहींना वाटतंय 1 नोव्हेंबर पासून दिवाळी सूरू होणार आहे. पण आम्ही तुम्हाला आज अचूक तारीख सांगणार आहोत. नेमकी दिवाळीच्या सुरूवात कधी पासून होणार आहे. आणि लक्ष्मीपूजन, भाऊबीज कधी आहे? आणि त्याचा शूभ मुहूर्त काय असणार आहे. (diwali 2024 laxmipujan and bhaubeej date muhurt read full) details 

हे वाचलं का?

यंदाची दिवाळी ही 4 दिवस असणार आहे. 31 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी. 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन, 2  नोव्हेंबरला दिवाळी पाडवा, 3 नोव्हेंबरला भाऊबीज असणार आहे. अशाप्रकारे 4 दिवस दिवाळी आहे.

यंदाच्या वर्षी वसूबारस हे 28 ऑक्टोबरला आहे. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एक वेळचे जेवण करून सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गाईचे श्लोक म्हणून सुर्यास्तानंतर पूजा करतात. आज शहरात अनेक ठिकाणी पूजनासाठी गाई उपलब्ध नसतात. अशावेळेस गाय वासराच्या मूर्तीची देखील पूजा करतात. तेही शक्य नसल्यास गायीच्या चित्राची पूजा करतात. 

हे ही वाचा : Numerology : 'या' जन्मतारखेच्या मुली घरात पैसाच पैसा आणतात, कुटुंबाच आर्थिक संकट होतं दूर

'या' दिवशी लक्ष्मी पूजन

शेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे (Laxmi Pujan) दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धिसाठी प्रार्थना करावयाची असते.

जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये । या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात् ।।अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणिधनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच । भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः ॥अशी कुबेराची प्रार्थना करावी. 

या पूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात

.लक्ष्मीपूजन मुहूर्त (1 नोव्हेंबर 2024, शुक्रवार)दु. 3 ते 5.15, सायं. 6 ते 8.30, रात्री 9.10 ते 10.45 

हे ही वाचा : Vastu Tips For Kitchen: चुकूनही 'या' दिशेला बांधू नका किचन! आर्थिक संकट येईलच पण आरोग्यही बिघडेल

'या' तारखेला भाऊबीज

यंदा 3 नोव्हेंबरला भाऊबीज आहे. नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज (Bhaubeej) सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे असे सांगितले आहे.

    follow whatsapp