Dussehra 2024 Daan : दसऱ्याला चुकूनही 'या' वस्तूंचे दान करू नका! घरावर येतं आर्थिक संकट

मुंबई तक

• 05:32 PM • 11 Oct 2024

Dussehra 2024 Daan : दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याचीही परंपरा आहे. शस्त्रांची पूजा केल्याने वाईट शक्तींचा नाश होतो, असे मानले जाते. तसेच मान्यतेनुसार दसऱ्याच्या दिवशी काही वस्तूंचे दान करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये.

  dussehara 2024 daan be aware and do not give away these things vijayadashami 2024 dasara festival in marathi

दसऱ्याला 'या' वस्तू दान करू नका

follow google news

बातम्या हायलाइट

point

दसऱ्याला 'या' गोष्टीचे दान करू नका

point

या वस्तुंचे दान करणे अशुभ मानलं जातं

point

दसऱ्याच्या दिवशी या चुका टाळा

Dussehra 2024 Daan : हिंदू पंचागानुसार दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता.श्रीरामाच्या सत्कर्मांनी रावणाच्या वाईट कृत्यांवर विजय मिळवला. म्हणून हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव म्हणूनही साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याचीही परंपरा आहे. शस्त्रांची पूजा केल्याने वाईट शक्तींचा नाश होतो, असे मानले जाते. तसेच मान्यतेनुसार दसऱ्याच्या दिवशी काही वस्तूंचे दान करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये.  (dussehara 2024 be aware and do not daan or give away these things vijayadashami 2024 dasara festival in marathi) 

हे वाचलं का?

चामड्याचे दान 

सनातन धर्मात प्राण्यांना पवित्र मानले जाते आणि चामडे केवळ प्राण्यांच्या कातडीपासूनच बनवले जाते. अशा परिस्थितीत चामड्याच्या वस्तू दान करणे म्हणजे प्राण्यांचा अनादर होतो. दसरा हा पवित्रता आणि पावित्र्याचा सण आहे, म्हणून चामड्याला अपवित्र मानले जाते. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी चामड्याच्या वस्तू दान करणे पवित्रतेच्या विरुद्ध आहे. असे केल्याने तुमच्यासाठी अशूभ ठरू शकते. 

हे ही वाचा : Dussehra 2024 : कधीच येणार नाही पैशांचं टेन्शन! दसऱ्याला सुधारा 'या' 5 आर्थिक चुका

धारदार वस्तूंचे दान 

धारदार वस्तू दान केल्याने घरामध्ये वाद, तणाव आणि मतभेद निर्माण होतात असे मानले जाते. असे म्हटले जाते की या गोष्टी नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि कुटुंबातील संबंधांमध्ये मतभेद निर्माण करतात. धारदार वस्तू दान केल्याने घरातील धनाची हानीही होते. तसेच या गोष्टी देवी लक्ष्मीला नाराज करतात, ज्यामुळे घरातून पैसा पळून जातो. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी हे दान करणे किंवा घेणे अशुभ मानले जाते.

हळदीचे दान

हिंदू धर्मात हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी आहे. असे मानले जाते की संध्याकाळी हळद दान केल्याने गुरु ग्रह कमजोर होऊ शकतो, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो. संध्याकाळी हळद दान केल्याने नकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे घरामध्ये त्रास होऊ शकतो. हळद जरी शुभ मानली जात असली तरी संध्याकाळी तिचे दान करणे अशुभ आहे.

हे ही वाचा : Dussehra 2024 : सीतेचं अपहरण, रावणाचा वध आणि रामाचा विजय...दसरा साजरा करण्यामागचं खरं कारण काय?

 (टीप : हा लेख लोकश्रद्धेवर आधारित आहे. येथे दिलेल्या माहितीच्या अचूकतेसाठी आणि पूर्णतेसाठी मुंबई Tak जबाबदार नाही.)

    follow whatsapp