Ladki Bahin Yojana Viral check: लाडक्या बहिणींना मिळणार खरंच FREE मोबाइल मिळणार?

मुंबई तक

12 Oct 2024 (अपडेटेड: 17 Oct 2024, 06:14 PM)

ladki Bahin Yojana Free Mobile Update : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात चार हफ्त्यांचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. पाचव्या आणि सहाव्या हफ्त्याचे पैसे लवकरच जमा केले जातील, असं आश्वासनही राज्य सरकारकडून दिलं जात आहे.

Ladki Bahin Yojana Free Mobile Viral Post

Ladki Bahin Yojana Free Mobile Scam

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणींनो 'हा' मेसेज आला असेल, तर आताच सावध व्हा

point

लाडक्या बहिणींना मोबाईल मोफत मिळणार का?

point

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या Free मोबाईल पोस्टचं सत्य काय?

ladki Bahin Yojana Free Mobile Update : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात चार हफ्त्यांचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. पाचव्या आणि सहाव्या हफ्त्याचे पैसे लवकरच जमा केले जातील, असं आश्वासनही राज्य सरकारकडून दिलं जात आहे.अशातच आता लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

हे वाचलं का?

या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत मोबाईल फोन मिळणार आहे, असे मेसेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. लाडकी बहीण योजना मोबाईल गिफ्ट (ladki Bahin Yojana Mobile Gift) अशा आशयाचे पोस्ट इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. पण या व्हायरल पोस्टमागे नेमकं काय सत्य आहे? याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. (A big update has come out regarding Ladki Bahin Yojana. The message that women will get free mobile phones through this scheme has gone viral on social media)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, आता महिलांना या योजनेच्या माध्यमातून मोबाईल फोन मोफत देणार असल्याची चर्चा सुरु आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मोबाईल फोने गिफ्ट देणार असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

हे ही वाचा >>  Maharashtra Weather: महाराष्ट्रात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पावसाचं सावट? पाहा IMD चा अंदाज

फ्री मोबाईलच्या ऑफरबाबत नेमकं सत्य काय? 

महिलांनी मोबाईलसाठी अर्ज करावे लागतील, असंही सांगण्यात येतंय. त्यामुळे राज्यातील लाखो महिला या मोबाईल स्कॅमला बळी पडू शकतात. गेल्या काही महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. डमी अर्ज भरून या योजनेचे पैसे हडप करण्याचा प्रकारही काही ठिकाणी घडल्याचं समोर आलंय. अशातच आता मोबाईल स्कॅमचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने, महिलांचा पुरता गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा >> Horoscope In Marathi: दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पडणार पैशांचा पाऊस? 'या' राशीच्या लोकांसाठी सोन्यासारखा दिवस

राज्य सरकारच्या वतीनं कोणत्याही प्रकारे लाडकी बहीण योजना मोबाईल गिफ्ट फॉर्म (Ladki Bahin Yojana Mobile Gift Form) देण्यात आलेला नाही. तसच यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील फेक व्हायरल मेसेज आणि व्हिडीओंपासून सावध राहावे, असा आवाहनं सरकारकडून करण्यात आलं आहे. 

    follow whatsapp