How To Keep Lemon Fresh : लिंबूचा वापर प्रत्येक हंगामात केला जातो. जेवणातील अन्न पदार्थ चविष्ट करण्यात लिंबूचा वापर केला जातो. पण आरोग्यासाठीही लिंबू खूप फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी लिंबूचा सर्वात जास्त वापर केला जातो. पण लिंबू खूप कमी वेळात खराब होतात. पण हे लिंबू जास्त वेळ ताजे आणि फ्रेश ठेवायचे असल्यास, तुम्हाला किचनच्या काही महत्त्वाच्या टीप्स फॉलो कराव्या लागतील.फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही लिंबू फक्त 2 ते 3 दिवस फ्रेश राहतात. त्यानंतर ते सुकतात. त्यामुळे लोक या सुकलेल्या लिंबूंना फेकून देतात. पण आता आम्ही तुम्हाला लिंबू ताजे ठेवण्यासाठी खास टीप्स सांगणार आहोत.
ADVERTISEMENT
टीप नंबर 1 - खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या
लिंबूला दिर्घकाळ फ्रेश ठेवण्यासाठी बाजारात योग्य लिंबू निवडा. यासाठी लिंबूला हलक्यात दाबून पाहा. जर तो जास्ट कडक असेल, तर असे लिंबू खरेदी करू नका. त्यामुळे मऊ लिंबू निवडून घ्या. तसच डाग लागलेल्या लिंबूलाही खरेदी करू नका.
हे ही वाचा >> Optical Illusion Test: उंट सर्वांनाच दिसतोय? पण फोटोत लपलाय हरण, 7 सेकंदात शोधून दाखवा
टीप नंबर 2 - फ्रिजमध्ये अशाप्रकारे स्टोर करा
लिंबूला दिर्घकाळ फ्रेश ठेवण्यासाठी त्यांना थेट फ्रिजमध्ये ठेऊ नका. लिंबूला चांगल्या पद्घतीत धुवून साफ करा. आता एका ग्लासमध्ये शुद्ध पाणी घ्या. या ग्लासच्या कंटेनरमध्ये लिंबू टाका आणि त्याचं झाकण बंद करा. तुम्ही या कंटेनरला फ्रिजमध्ये ठेऊ शकता. असं केल्याने लिंबू खराब होत नाहीत.
टीप नंबर 3 - फ्रिज नसल्यास लिंबू स्टोअर कसे कराल
जर तुम्हाला फ्रिजशिवाय लिंबू स्टोअर करायचे असतील, त्यासाठी लिंबूला चांगल्या प्रकारे धुवून ठेवा. त्यानंतर ते पुसून घ्या आणि त्याच्यावर हलक्या स्वरुपात तेल लावा. त्यानंतर लिंबूला वेगवेगळ्या टीशू पेपेरने कवर करा. असं केल्यानंही लिंबू लगेच सुकत नाहीत.
हे ही वाचा >> Video: काय सांगता! टोपलीभर लसूण झटपट होतील सोलून; फक्त 'या' ट्रिक्सचा वापर करा
टीप नंबर 4 - लिंबूतून जास्त रस कसा काढाल?
लिंबूतून जास्तीत जास्त रस काढण्यासाठी सर्वात आधी त्याला कडक जागेवर ठेऊन रगडा आणि त्यातून रस बाहेर काढा. असं केल्याने लिंबू नरम होतो. ज्यामुळे त्या लिंबूचा सर्व रस सहजपणे बाहेर काढता येतो.
ADVERTISEMENT