Dussehra 2024 : सीतेचं अपहरण, रावणाचा वध आणि रामाचा विजय...दसरा साजरा करण्यामागचं खरं कारण काय?

मुंबई तक

• 04:54 PM • 11 Oct 2024

Dussehra 2024 : हिंदू पंचागानुसार आश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्री साजरी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. यालाच विजयादशमी देखील म्हटले जाते. पण हा दसरा का साजरा केला जातो? याबाबच्या मान्यता काय आहेत? हे जाणून घेऊयात.

dussehra-2024-12-october-2024-history-and-significance-of-ravan-dahan-festival vijayadashami 2024

दसरा का साजरा केला जातो?

follow google news

बातम्या हायलाइट

point

दसरा का साजरा केला जातो?

point

दसरा साजरा करण्याचे महत्व काय?

point

दसरा साजरा करण्याची मान्यता काय?

Dussehra 2024 : हिंदू पंचागानुसार आश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्री साजरी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. यालाच विजयादशमी देखील म्हटले जाते. पण हा दसरा का साजरा केला जातो? याबाबच्या मान्यता काय आहेत? हे जाणून घेऊयात.(dussehra-2024-12-october-2024-history-and-significance-of-ravan-dahan-festival vijayadashami 2024) 

हे वाचलं का?

कैकयी मातेच्या सांगण्यानुसार, आपले पिता दशरथ यांच्या आज्ञेनुसार राजा राम आपली भार्या सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासह 14 वर्षाच्या वनवासाला निघाले. एका जंगलात त्यांनी आपली पर्णकुटी उभारली आणि तिथे ते आपल्या पत्नी आणि भावासह राहू लागले. कालांतराने रावणाने आपल्या कुटील डावाने माता सीतेचं अपहरण केलं आणि रामायणाच्या खऱ्या आध्यायाला सुरूवात झाली होती. 

हे ही वाचा : Gold Rate Today : आजच खरेदी करा सोनं! नवरात्रीत किमती घसरल्या, मुंबईसह 'या' प्रमुख शहरांमध्ये भाव काय?

त्यानंतर रामाने रावणाचा वध केला होता. ज्या दिवशी मर्यादा पुरषोत्तम श्री राम यांनी रावणाचा वध केला तो शारदीय नवरात्रीचा दहावा दिवस होता. रामाने 9 दिवस दुर्गा देवीची पूजा केली त्यानंतर दहाव्या दिवशी रावणावर विजय मिळवला. म्हणून हा सण विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. श्रीरामाच्या सत्कर्मांनी रावणाच्या वाईट कृत्यांवर विजय मिळवला. म्हणून हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव म्हणूनही साजरा केला जातो. 

महिषासुराचा वध माता दुर्गाने केला 

पौरांणिक मान्यतांनुसार विजयादशमी साजरा करण्यामागील आणकी एक समज अशी आहे की या दिवशी देवी दुर्गेने चंडीचे रूप धारण करून महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. महिषासूर आणि त्यांच्या सैन्याने हैराण केल्यामुळे, देवी दुर्गेने महिषासूर आणि त्याच्या सैन्याशी सलग नऊ दिवस युद्ध केले आणि 10 व्या दिवशी महिषासुरचा अंत करण्यात यश आले. त्यामुळे शारदीय नवरात्रीनंतर दसरा साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी दुर्गा मातेच्या मुर्तीचेही विसर्जन केले जाते. 

    follow whatsapp