Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात हस्तांतर झाला आहे. यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात 3000 आणि 7500 जमा झाले आहेत. अशाप्रकारे तब्बल 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. या दरम्यान अनेक महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. पण त्यांच्या खात्यात एकही रूपया आला नाही आहे. त्यामुळे या महिलांचे नेमके पैसे गेले कुठे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme 7500 and 3000 amount deposite bank account but how to check in simple steps read full story)
ADVERTISEMENT
खरं तर ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेत अर्ज केला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला आहे. त्या महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत इतकं मात्र नक्की. काही महिलांच्या बाबतीत असे देखील झाले आहे की, त्यांनी अर्जात भरलं वेगळं बँक खातं आणि त्यांच्या वेगळ्या आणि जून्या बँकेत पैसे आले आहेत. तरी काही महिलांचा अर्ज मंजूर होऊन देखील पैसे आले नाही आहे? असं नेमकं काय होतं आहे. हे जाणून घेऊयात. आणि तुमचे नेमके पैसे कुठे गेले आहेत? हे देखील तपासूया.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'ना मोठा झटका, खात्यात पैसे जमा होण्याची संपली मुदत?
पैसे बँकेत जमा झाले की नाही असं करा चेक
गुगलवर जाऊन तुम्ही MyAadhar टाईप करा. त्यानंतर आधारची साईट ओपन होईल.
नवीन पेज उघडल्यावर सर्वांत खाली Bank Seeding Status पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला आधारकार्ड आणि कॅप्चा भरण्याचा पर्याय येईल.
हा कॅप्चा भरल्यावर तुम्हाला Otp येईल. हा ओटीपी भरायचा आहे.
त्यानंतर नवीन पेज ओपन होईल आणि तुमचं आधार कोणत्या बँकेशी लिंक आहे. याची माहिती देण्यात येईल.
जर बँकेची नावाचा रकाना रिकामी असेल तर कोणतंच बँक खातं लिंक नाही. त्यामुळे तुम्हाला ते लिंक करून घ्यावं लागेल.
आधारशी बँक लिंक असेल तरच महिलांच्या खात्यात पैसे येणार आहे.
अशाप्रकारे तुमच्या कोणत्या बँकेत पैसे जमा झाले आहेत. हे तपासता येणार आहे. तसेच ज्या महिलांनी अर्जात वेगळं बँक खातं दिलं आहे आणि दुसऱ्याच बँक खात्यात पैसे आले आहेत. याचा अर्थ त्या महिलांचं जूने बँक खातं आधारशी लिंक होतं. त्यामुळे त्या बँक खात्यात पैसे आले आहेत. त्यामुळे अशाप्रकारे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कोणत्या खात्यात जमा झाले आहेत. याची माहिती मिळणार आहे.
ADVERTISEMENT