Weight Loss Tips: सुटलेलं पोट कमीच होत नाही? फक्त 'या' तीन गोष्टी फॉलो करा, सर्व चरबी मेणासारखी वितळेल 

मुंबई तक

03 Nov 2024 (अपडेटेड: 03 Nov 2024, 04:03 PM)

eight Loss Tips And Tricks : लठ्ठपणा सध्याच्या घडीची एक मोठी समस्या आहे. भारतात अनेक लोक लठ्ठपणाच्या समस्यांनी ग्रस्त झाले आहेत. लठ्ठपणामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

weight loss tips and tricks

weight loss tips and tricks

follow google news

बातम्या हायलाइट

point

लठ्ठपणा कमी करण्यासाठी रामबाण उपाय कोणते?

point

आहारात या पदार्थांचा समावेश करा

point

...तरच कंबरेचा घेर होईल कमी

Weight Loss Tips And Tricks : लठ्ठपणा सध्याच्या घडीची एक मोठी समस्या आहे. भारतात अनेक लोक लठ्ठपणाच्या समस्यांनी ग्रस्त झाले आहेत. लठ्ठपणामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल आणि खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नसेल, तर आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत. या गोष्टींचं नियमित पालन केल्यावर तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. असंतुलीत आहार आणि खराब लाईफस्टाईलमुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. 

हे वाचलं का?

पोषणयुक्त भरपूर नाष्टा करा

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर पोषक तत्वांनी भरलेल्या अन्नपदार्थांचं सेवन तुम्ही करू शकता. तुम्ही ब्रेकफास्टला अजिबात स्कीप करू नका. यामध्ये तुम्ही प्रोटीन,फायबर,ज्यूस,फळे,ओट्स या गोष्टींचा ब्रेकफास्टमध्ये समावेश करू शकता. प्रथिनयुक्त आहार फॉलो केल्यानं वजन कमी होऊ शकतं. जंकफूड, मैदा, साखर, तळलेले पदार्थ अजिबात खाऊ नका. फळ आणि भाज्यांचं सेवन जास्त करा. यामध्ये फायबर आणि पोषक तत्व असतात. तसच पत्ताकोबीचं सेवन करा. यामध्ये टेरटॅरिक अॅसिड असतं. जे वजन कमी करण्यास मदतशीर ठरतं.

हे ही वाचा >>  ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं 'दिवाळी गिफ्ट'! उपमुख्यमंत्र्यांनी योजनेबाबत केली मोठी घोषणा

लवकर उठण्याची सवय ठेवा

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर तुम्हाला सकाळी लवकर उठण्याची सवय ठेवणं गरजेचं आहे. आयुर्वेदानुसार, सकाळी लवकर उठल्यावर अनेक रोगांच्या समस्यांपासून सुटका होऊ शकते. तसच लठ्ठपणावरही मात करू शकता. सकाळी लवकर उठल्याने तुमचं शरीर अॅक्टिव्ह राहतं. त्यामुळे शरीरातील चरबी वितळण्यास मदत होते.

हे ही वाचा >>  Ind vs Nz 3rd Test: पराभवाचं खापर कुणावर फोडलं? रोहित शर्माच्या प्रतिक्रियेनं खळबळ; म्हणाला, "कर्णधार म्हणून..."

रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या

सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी कोमट पाण्याचं सेवन करा. यामुळे मेटाबॉलिज्म वाढतं आणि तुमचं शरीर डिटॉक्सीफाय होतं. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही कोमट पाण्यात लिंबू टाकून त्या पाण्याचं सेवन करू शकता. तसच यात मध, आल्याचा रस आणि अॅपल सायडर व्हिनेगार टाकून ते पाणी पिऊ शकता.

    follow whatsapp