ladki Bahin Yojana: दिवाळीत मिळाले नाहीत लाडकी बहीण योजनेचे 1500? कधी होतील खात्यात जमा?

मुंबई तक

04 Nov 2024 (अपडेटेड: 04 Nov 2024, 03:29 PM)

Ladki Bahin Yojana Latest Updates: देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. कोट्यावधी लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो.

ladki bahin yojana scheme third installment women account does not deposite money aditi tatkare ajit pawar eknath shinde mukhyamantri ladki bahin yojana scheme

अनेक महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाहीयेत.

follow google news

बातम्या हायलाइट

point

'असं' चेक करू शकता लाडकी बहीण योजनेचा स्टेटस

point

लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट समोर

point

कोणा कोणाला मिळाले नाहीत लाडकी बहीण योजनेचे पैसे?

Ladki Bahin Yojana Trending Updates: देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. कोट्यावधी लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो. मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री Shivraj Singh Chauhan यांनी 2023 मध्ये या राज्यातील महिलांसाठी Ladli Bahin Yojana सुरु केली होती. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. सरकारच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. सरकारच्या माध्यमातून पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा केले जातात. योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात  तीन हफ्ते जमा झाले आहेत. जर तुम्हाला दिवाळीला योजनेच्या हफ्त्याचे पैसे मिळाले नसतील, तर अशाप्रकारे तुम्ही स्टेटस चेक करू शकता. 

हे वाचलं का?

अशाप्रकारे चेक करा स्टेटस

Beneficiary of Ladki Behan Yojana:जर तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे दिवाळीपर्यंत मिळाले नसतील. तर तुम्ही या योजनेच्या हफ्त्यांची माहिती ऑनलाईन तपासू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर https://testmmmlby.mahaitgov.in/ क्लिक करा. त्यानंतर होमपेज लॉगइनचा ऑप्शन तुमच्या समोर असेल.

हे ही वाचा >> Todays Gold Price : दिवाळी संपताच ग्राहकांचं काळीज धडधडलं! पाहा आजचे 24 कॅरेटचे भाव...

तसच लाभार्थ्यांची स्थिती काय आहे? हे तुम्ही खाली दिलेल्या ऑप्शनवर तपासू शकता. तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमच्या समोर मोबाईल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबरचा ऑप्शन असेल. रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर यापैकी कोणतीही माहिती मिळाल्यावर तुम्हाला कॅप्चा कोड टाकावं लागेल. गेट मोबाईल ओटीपीवर क्लिक करावं लागेल. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला स्टेटस तपासता येईल.

हे ही वाचा >> Nawab Malik : शिंदे-पवारांची चर्चा सुरू? विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार? मलिकांच्या वक्तव्यानं सस्पेन्स वाढला

या महिलांना याजनेचा मिळतो लाभ 

Women Beneficiary of Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजनेचा राज्यातील 2.5 कोटींहून अधिक महिलांना लाभ मिळाला आहे. या योजनेसाठी सरकारने काही अटीही जाहीर केल्या आहेत. ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

    follow whatsapp