Mazi Ladki Bahin Yojana Money: 'ही' चूक केली की 1500 रुपये विसरा.. थोडं सांभाळून!

मुंबई तक

• 07:53 PM • 11 Jul 2024

Mazi Ladki Bahin Yojana Bank Account: माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना बँक अकाउंटसंबंधी एक चूक जरी केली तर तुम्हाला 1500 रुपये मिळणार नाही. याबाबत जाणून घ्या सविस्तरपणे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी बँक खात्याची माहिती द्या अचूक

माझी लाडकी बहीण योजनेसाठी बँक खात्याची माहिती द्या अचूक

follow google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरा बिनचूक

point

बँकेसंबंधी नेमकी कोणती माहिती भरायची?

point

माझी लाडकी बहीण योजनेसाठी बँक खातं आवश्यक

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Bank Account: मुंबई: महाराष्ट्रातील शिंदे सरकारने अंतरिम अर्थसंकल्प मांडताना गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेसाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील सर्व महिला लाभ घेऊ शकतात. पण या योजनेसाठी अर्ज करताना जर एक चूक केली तर आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरू शकतं. (if you make a mistake regarding bank account while applying for mazi ladki bahin yojana you will not get Rs 1500)

हे वाचलं का?

माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतून 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.

हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana: पटकन अर्ज भरा... माझी लाडकी बहीण योजनेचे थोडेच दिवस शिल्लक!

Mazi Ladki Bahin Yojana चा अर्ज भरताना ही चूक अजिबात करू नका, नाहीतर...

माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना एक चूकही तुम्हाला 1500 रुपये मिळण्यापासून वंचित ठेऊ शकते. यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत विधानसभेत बोलताना बँक खात्याविषयी त्यांनी काही सूचना केल्या होत्या. 

अर्ज भरताना तुम्ही तुमचा बँक अकाउंट नंबर जो आहे तो व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. याशिवाय IFSC कोड अशी सगळी माहिती बिनचूक भरणं गरजेचं आहे. याशिवाय बँकेचं नाव, बँकेची शाखा ही सगळी माहिती भरणंही आवश्यक आहे.

हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana List: 1500 रुपये मिळणार की नाही? असं तपासा यादीत तुमचं नाव!

यामध्ये जर चूक झाली तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. यामुळे बँकेसंबंधी जो काही तपशील आहे तो अगदी नेमकेपणाने भरणं गरजेचं आहे.

Mazi Ladki Bahin Yojana अर्जामध्ये बँकेसंबंधी कोणकोणती माहिती भरायची?

  • बँक खातेधारकाचे नाव 
  • बँक खाते क्रमांक 
  • IFSC कोड
  • बँकेचे पूर्ण नाव आणि शाखेचं नाव

अर्जामध्ये ही माहिती अगदी व्यवस्थित भरली तरच पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये बँक खात्यात मिळतील. पण यामध्ये कोणतीही चूक झाली तर महिलांना 1500 रुपयांना मुकावं लागू शकतं. 

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती? 

जेव्हा माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली तेव्हा अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जुलै ते 15 जुलै अशी होती परंतु आता ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यातील अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ सहज मिळावा, यासाठी योजनेच्या निकषांमध्ये काही बदलही करण्यात आले असून, अटीही शिथिल करण्यात आल्या आहेत.

माझी लाडकी बहीण योजनेचे कधी येणार पैसे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन/ऑफलाईन अर्जानंतर, सर्व पात्र महिलांची यादी सरकारकडून प्रसिद्ध केली जाईल, ज्या महिलांची नावे यादीत समाविष्ट असतील त्यांना या योजनेचा पहिला हप्ता सप्टेंबर महिन्यात दिला जाईल.

    follow whatsapp