Subhadra Yojana Latest News Update : स्वातंत्र्यानंतर महिलांना सामजिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी अनेक संविधानिक अधिकार दिलेले आहेत. याशिवाय त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठीही केंद्र आणि राज्य सरकारेही वेळोवेळी अनेक योजना सुरु करतात. या योजनांच्या माध्यमातून सरकार त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करून त्यांना स्वयंरोजगाराच्या दिशेनं पुढे नेत आहे. अशातच आम्ही तुम्हाला ओडिसा सरकारच्या एका जबरदस्त योजनेबाबत सांगणार आहोत. सुभद्रा असं या योजनेचं नाव आहे. सुभद्रा योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबरला जन्मदिनाच्या निमित्ताने केली होती. सुभद्रा योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना वर्षाला दहा हजार रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं.
ADVERTISEMENT
वर्षाला दोन हफ्त्यांच्या माध्यमातून महिलांना दहा हजार रुपयांची रक्कम दिली जाते. प्रत्येक हफ्त्याच्या अंतर्गत पाच हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ फक्त ओडिसा राज्यातील महिलांनाच मिळतो. दुसऱ्या राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
सुभद्रा योजनेत 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिला अर्ज करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचं नाव राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम (NFSA) किंवा राज्य अन्न सुरक्षा योजनेंतर्गत (SFSS) रेशन कार्डमध्ये जोडलेलं पाहिजे.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार? 1500 की 2100? मुनगंटीवारांनी थेट सांगितलं
ज्या महिला आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत, अशा महिलांनाचा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या महिलांची आर्थिक स्थिती मजबूत आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसच ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत आणि कर भरतात, त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही सुभद्रा योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर तुमच्याकडे आधारकार्ड, बँक अकाऊंट डिटेल्स, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, फोटो, ई-केवायसी डॉक्युमेंट इ. आवश्यकता आहे.
हे ही वाचा >> 3 December 2024 Gold Rate : खुशखबर! लगेच खरेदी करा सोनं, गोल्ड रेटमध्ये पुन्हा घसरण, मुंबईत आजचा भाव काय?
ADVERTISEMENT