Aadhaar Card Update: खुशखबर! 'या' तारखेपर्यंत मोफत करा 'आधार कार्ड' अपडेट, प्रोसेस जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई तक

02 Dec 2024 (अपडेटेड: 02 Dec 2024, 06:37 PM)

Free Aadhaar Card Update Date :  आधारकार्ड सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट बनलं आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी, सिम कार्ड घेण्यासाठी आणि बँक खाते सुरु करण्यासह इतर महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्डची आवश्यकता लागते.

Aadhar Card Free Update Last Date

Aadhar Card Free Update Last Date

follow google news

बातम्या हायलाइट

point

कधीपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता?

Free Aadhaar Card Update Date :  दैनंदिन जीवनात आणि कागदोपत्री व्यवहारांमध्ये आधारकार्ड सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट बनलं आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी, सिम कार्ड घेण्यासाठी आणि बँक खाते सुरु करण्यासह इतर महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्डची आवश्यकता लागते. अनेक लोकांनी खूप पूर्वी आधार कार्ड बनवलं होतं. पण त्यात नाव आणि जन्म दिनांकाच्या माहितीत काही चुका राहिल्या होत्या. अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण 14 डिसेंबर 2024 पर्यंत त्यांना आधार कार्डची मोफत अपडेट करता येणार आहे. त्यानंतर आधार कार्ड अपडेट केल्यावर पैसे भरावे लागणार आहेत.

हे वाचलं का?

आधार कार्ड अपडेट का करावं?

आधार बनवणारी संस्था UIDAI ने सर्व लोकांना सल्ला दिलाय की, जर आधार कार्डमध्ये माहिती अपडेट करून 10 वर्ष पूर्ण झाले असतील, तर ते आधार कार्ड नक्कीच अपडेट करा. तुम्ही तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख 14 डिसेंबर 2024 पर्यंत मोफत अपडेट करू शकता. ही प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आहे. तुम्ही घरबसल्या सर्व माहिती सहजपणे अपडेट करू शकता.

हे ही वाचा >> PM Narendra Modi बघणार 'द साबरमती रिपोर्ट', 'या' ठिकाणी होणार चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग

ऑनलाईन आधार अपडेट करण्याची प्रक्रिया

  • UIDAI च्या वेबसाईटवर (myaadhaar.uidai.gov.in) लॉग ईन करा
  • अपडेट सेक्शन निवडा आणि 'माय आधार'च्या माध्यमातून 'अपडेट युअर'वर क्लिक करा.
  • डिटेल अपडेट पेजवर जाऊन 'अपडेट आधार डिटेल्स' निवडा आणि 'डॉक्युमेंट अपडेट'वर क्लिक करा.
  • इथे क्रेडेंशियल टाकून आधार क्रमांक आणि कॅप्चा भरा. नंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा.
  • आता तुम्हाला रजिस्टर मोबाईलवर आलेल्या ओटीपीने लॉग इन करायचं आहे.
  • इथे अपडेट ऑप्शन निवडा. तुमचं नाव, पत्ता इ. ला अपडेट करण्यासाठी विकल्प निवडा.
  • त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करा. आवश्यक माहिती भरून सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.
  • सबमिटवर क्लिक केल्यानंतर प्रोसेस पूर्ण होईल. आता अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) ला सेव्ह करा. याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आधारच्या अपडेटच्या प्रोसेसला ट्रॅक करू शकता.

हे ही वाचा >> Solar Eclipse 2025 : कधी आहे सूर्यग्रहण? भारतात दिसणार अद्भूत दृष्य; घरबसल्या कसं पाहाल?

जर तुम्हाला बायोमॅट्रिक बदल करायचे असतील, तर त्यासाठी ऑफलाईन प्रोसेस फॉलो करावी लागेल. यामध्ये आयरिस, फिंगरप्रिंट, मोबाईल नंबर किंवा अपडेटचं काम फक्त ऑफलाईन केलं जाऊ शकतं. परंतु, काही बदल फक्त एकाच वेळी केले जाऊ शकतात. 

ऑफलाईन अपडेट करण्याची प्रक्रिया

तुम्ही आधारकार्डला ऑफलाईनही अपडेट करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला आधार सेंटरवर जावं लागेल. ही प्रक्रिया निशुल्क नाही. यासाठी तुम्हाला पैसै द्यावे लागतील.

  • UIDAI च्या वेबसाईटवर आधार अपडेट फॉर्म डाऊनलोड करा.
  • जवळच्या आधारसेवा केंद्रात फॉर्म आणि डॉक्युमेंट सबमिट करा
  • बायोमॅट्रिक सबमिशनसाठी आधार केंद्रावर बायोमॅट्रिक डेटा द्या.
  • आता तुम्हाला रिक्वेस्टच्या ट्रॅकिंगसाठी URN स्लिप मिळेल. 

    follow whatsapp