Ladki Bahin Yojana : बाईईई हा काय प्रकार? 4500 नंतर लगेच 3000 खात्यात होणार डिपॉझिट

मुंबई तक

• 04:50 PM • 05 Oct 2024

Mukhymantri ladki Bahin Yojana Scheme, Fourth installment: खरं तर अनेक महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 जमा झाले आहेत. त्यानंतर आता महिलांच्या खात्यात आता ऑक्टोबरमध्ये चौथा हप्ता जमा होणार आहे. मात्र या चौथ्या हप्त्या दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे.

ladki bahin yojana fourth installment date and amount declare 3000 amount deposite women account mukhymantri ladki bahin yojana scheme ajit pawar aditi tatkare eknath shinde

अनेक महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 जमा झाले आहेत.

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑक्टोबरमध्ये 3000 खात्यात जमा होणार

point

नोव्हेंबरचे पैसेही खात्यात येणार

point

'या' कारणामुळे एकत्र पैसे देणार

Mukhymantri ladki Bahin Yojana Scheme, Fourth installment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात 4500 आणि 1500  रूपये जमा झाले आहेत. उर्वरीत महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा होण्याची प्रक्रिया सूरू आहे. असे असताना महिलांच्या खात्यात काहीच दिवसात 3000 रूपये देखील जमा होणार आहे. त्यामुळे 4500 पाठोपाठ आता लगेच 3000 जमा होणार असल्याने महिलांची लॉटरीच लागली आहे. (ladki bahin yojana fourth installment date and amount declare 3000 amount deposite women account mukhymantri ladki bahin yojana scheme ajit pawar aditi tatkare eknath shinde) 

हे वाचलं का?

खरं तर अनेक महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 जमा झाले आहेत. त्यानंतर आता महिलांच्या खात्यात आता ऑक्टोबरमध्ये चौथा हप्ता जमा होणार आहे. मात्र या चौथ्या हप्त्या दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. या आचारसंहितेमुळे सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता असा एकत्र मिळून 3000 रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिलांना लगेचच 3000 रूपये मिळणार आहेत. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : तब्बल 1 कोटी 96 लाख महिलांच्या खात्यात 4500 जमा?, तुमच्या अर्जाचं काय झालं?

'या' तारखेला खात्यात येणार पैसे? 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे आताच ऑक्टोबर महिन्यात देणार असल्याचा मानस महायुती सरकारचा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी ही ऑक्टोबरलाच साजरी होणार असून, भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे काही दिवसांतच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. 

लाडकी बहीण योजनेचे पहिल्यांदा 3000 रूपये दिले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये मिळाले आहेत. बहिणींनी काही काळजी करू नये. कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आधी, भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे. हा शब्द तुम्हाला देतो, असे आश्वासन अजित पवारांनी महिलांना दिले आहे. त्यामुळे चौथ्या हप्त्याचे पैसे आता 10 ऑक्टोबरआधी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना पुन्हा मिळणार 4500? बँकेची 'ती' चूक...

किती पैसे येणार? 

ज्या महिलांना आधी लाभ मिळाले आहेत.त्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे 10 ऑक्टोबर आधी महिलांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे.  ज्या महिलांना आधीच्या महिन्यांचा लाभ मिळाला नाही आहे. त्यांना त्या महिन्याचे मिळून पैसे मिळणार आहे. आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करायला सूरूवात केली आहे. त्यांना सप्टेंबरपासून अनुक्रमे पैसे मिळणार आहे. जसे या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळाला असेल, तर त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 खात्यात येणार आहेत. 

दरम्यान कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळाले नाही आहेत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही आहेत. त्या महिलांच्या खात्यावरही पैसे आले नाही आहेत. त्यामुळे अद्याप एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनी लवकरच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून करता येत आहे. 

    follow whatsapp