Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रलंबित अर्जांची तपासणी सुरु करण्यात आलीय. महिला आणि बाल विकास विभागाच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात 20 लाख 84 हजार अर्जदारांना योजनेचा लाभ मिळाला आहे. परंतु, पुण्यातील जवळपास 10 हजार महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाहीय, ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता. परंतु, त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या नाहीत.
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजनेसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत पुण्यातून 21 लाख 11 हजार 363 अर्ज मंजूर झाले होते. परंत, अजूनही 12 हजार अर्ज प्रलंबित असून त्यांची तपासणी करण्याचं काम बाकी आहे. आतापर्यंत 9 हजार 814 अर्जांमध्ये काही त्रुटी आढळल्याने ते सर्व अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. तर 5 हजार 814 अर्ज क्षुल्लक त्रुटींमुळे रद्द करण्यात आले.
पुणे शहरातून एवढ्या अर्जांची नोंद
पुणे शहरातून लाडकी बहीण योजनेसाठी 6 लाख 82 हजार 55 अर्जांची नोंद झालीय. यामध्ये 6 लाख 67 हजार 40 अर्ज मंजूर झाले. यापैकी 3 हजार 494 अर्ज रद्द करण्यात आले. या जिल्ह्यातील हवेली तालुक्यात सर्वात अधिक 4 लाख 19 हजार 859 अर्जांची नोंद केली केली. यापैकी 4 लाख 15 हजार 510 अर्ज मंजूर झाले. यामध्ये 1 हजार 166 अर्ज रद्द करण्यात आले.
हे ही वाचा >> 11 November 2024 Gold Rate: आरारारा! सोन्याचे भाव गगनाला भिडले; मुंबई-पुण्यातील दर वाचून अनेकांना फुटला घाम
पुण्यात एकूण 21 लाख अर्ज
पुणे जिल्ह्यात एकूण 21 लाख 11 हजार 946 अर्जांची नोंद झाली. यापैकी 20 लाख 84 हजार 364 अर्ज मंजूर झाले. तर 9 हजार 814 अर्ज अपात्र म्हणून घोषित करण्यात आले.
हे ही वाचा >> Nana Patekar : "मी अभिनेता नसतो, तर अंडरवर्ल्डमध्ये...", 'त्या' घटनेबद्दल बोलताना काय म्हणाले नाना पाटेकर?
राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं होतं. फडणवीस म्हणाले, या योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जाच्या नोंदीची तपासणी केली जाईल. ज्या महिलांनी योजनेच्या नियमांचं पालन केलं नाही, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्या महिलांना या योजनेतून बाहेर केलं जाईल.
ADVERTISEMENT